Cricket Money Dispute | क्रिकेटच्या पैशावरून घरात घुसून कोयत्याने हल्ला

महिला जखमी; रेकॉर्डवरील गुन्हेगारासह चौघांना अटक
Cricket Money Dispute |
Cricket Money Dispute | क्रिकेटच्या पैशावरून घरात घुसून कोयत्याने हल्ला
Published on
Updated on

इचलकरंजी : आयपीएल क्रिकेटच्या पैजेमध्ये हरलेले ७० हजार रुपये वसूल करण्यासाठी धारदार कोयत्यासह घरात घुसून दमदाटी करीत महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. फर्जाना चांद गडकर (वय ४२) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज ऊर्फ चिल्या मारुती माने याच्यासह नीलेश मारुती माने, विशाल गणपती माने, सौरभ दयानंद दाडमोडे या चौघांना अटक करण्यात आली. याची माहिती पो.नि. शरद मेमाणे यांनी दिली.

फिर्यादी मुस्तफा सिकंदर शेख (रा. जयभीमनगर) व संशयित सूरज माने यांच्यात आयपीएल क्रिकेटवरून पैज लागली होती. पैजेत हरलेले ७० हजार रुपये मागणीसाठी चारही संशयित धारदार कोयता घेऊन शेख यांच्या घरात घुसले व त्यांनी दमदाटी केली. यावेळी शेख यांची नातेवाईक फर्जाना धावून आली असता तिच्यावर संशयितांनी कोयत्याने वार केला. यामध्ये त्या जखमी झाल्या. अटक केलेल्या चौघाही संशयितांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास हे. कॉ. तांबे करीत आहेत.

बड्या गँगला रसद?

या प्रकरणातील मुख्य संशयित शहरातील एका बड्या गँगला एका भाईच्या साथीने रसद पुरवत असल्याची चर्चा आहे. यावरून संशयितांची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पो. नि. शरद मेमाणे यांनी दिली. क्रिकेटची पैज हरल्याचा गुन्हा दाखल असला, तरी आयपीएल बेटिंग प्रकरणातील रकमेवरुन वाद झाल्याचीही चर्चा आहे. यातून बेटिंगप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या एका संशयितालाही बोलावून त्याची चौकशी केल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news