Kolhapur Crime | हलकर्णी फाटा, मजरे कार्वे येथे मटका अड्ड्यांवर धाड; चौघांविरुद्ध गुन्हे

एलसीबी व चंदगड पोलिसांची संयुक्त कारवाई;
Chandgad Illegal Gambling
Chandgad Illegal Gambling AI
Published on
Updated on

Chandgad Illegal Gambling

चंदगड : कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि चंदगड पोलिसांनी हलकर्णी फाटा व मजरे कार्वे (ता. चंदगड) परिसरातील मटका अड्ड्यांवर संयुक्त कारवाई करत चौघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण २६ हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पहिल्या कारवाईत हलकर्णी फाटा येथील प्रार्थना बारजवळ दत्तू सन्नाप्पा नाईक (वय ३०, रा. वरगाव, ता. चंदगड) हा लोकांकडून पैसे स्वीकारून मटक्याच्या चिठ्ठ्या देत जुगार चालवत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी मटका अड्डा चालक संभाजी गोपाळ गावडे (रा. जंगमहट्टी, ता. चंदगड) याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईदरम्यान ८ हजार २१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Chandgad Illegal Gambling
Kolhapur News | जिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छतेच्या आदेशाला ग्रामपंचायतींचा हरताळ

दुसऱ्या कारवाईत बेळगाव-वेंगुर्ला राज्य मार्गालगत मजरे कार्वे येथील न्यू साई प्रकाश ट्रेडर्ससमोर अश्विन विठ्ठलराव पाटील (वय ५२, मूळ रा. जंगमहट्टी, सध्या रा. मजरे कार्वे) हा मटका जुगार चालवत असल्याचे आढळले. पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले असून या प्रकरणात १५ हजार ५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तिसऱ्या कारवाईत हलकर्णी फाटा येथील साई दत्त हॉटेलच्या मागील बाजूस रमेश अण्णाप्पा भोवड (वय ५०, रा. जट्टेवाडी, ता. चंदगड) हा मटका जुगार चालवत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून ३ हजार ८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Chandgad Illegal Gambling
Goat Electrocution Kolhapur | गोकुळ शिरगावात विजेच्या धक्क्याने तीन गाभण शेळ्यांचा मृत्यू

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार दीपक घोरपडे, योगेश गोसावी, ए. बी. माने तसेच चंदगड पोलिसांच्या पथकाने केली. या सर्व प्रकरणांचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल ए. बी. माने करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news