

उदगाव : पुढारी वृत्तसेवा : सांगली -कोल्हापूर महामार्गावर उदगाव येथील कृष्णा नदीच्या पुलावरून कार नदीत कोसळले. ही घटना आज (दि.७) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. यात दोघे जखमी झाले असून त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पुलावरून कार कोसळल्यानंतर चारचाकी वाहनातील एअर बँग खुली झाल्याने सुदैवाने जीव वाचला आहे. घटनास्थळी जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष डॉ. नीता माने यांनी जयसिंगपूर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस व स्थानिक नागरिकांनी मदत कार्य केले. या अपघातामुळे सांगली- कोल्हापूर महामार्गावर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
हेही वाचा