कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जपान मधील फुकुओका येथे जागतिक जलतरण संघटना (फिना) आयोजित वर्ल्ड मास्टर्स जलतरण स्पर्धेत कोल्हापूरचा जलतरण पटू रोहित राजेंद्र हवालदार याने कास्य पदकाची कमाई केली. रविवारी २०० मिटर बॅकस्ट्रोक प्रकारात रोहितने हे यश मिळवत सुमारे दहा वर्षांनी कमबॅक केले.
रोहितने २०१४ साली जागतिक विश्वविद्यालय स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर आज प्रथमच जपान येथे झालेल्या जागतिक मास्टर्स जलतरण स्पर्धेत सहभागी होऊन कास्य पदक मिळवले. आणखी ३ स्विमिंग प्रकारात त्याचा सहभाग आहे. शिछत्रपती पुरस्कार प्राप्त रोहित गेली ६ वर्षे आयकर विभागात सक्रिय आहे.
हेही वाचा :