कोल्हापूर : दत्तवाड येथील दूधगंगा नदीवरील दोन्ही बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : दत्तवाड येथील दूधगंगा नदीवरील दोन्ही बंधारे पाण्याखाली

दत्तवाड; पुढारी वृत्तसेवा : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दूधगंगा नदीवरील महाराष्ट्र कर्नाटकला जोडणारे दत्तवाड मलिकवाड व दत्तवाड एकसंबा ही दोन्ही बंधारे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यावरून होणारी दोन्ही राज्यातील वाहतूक बंद झाली आहे.

महाराष्ट्र कर्नाटकला जोडणारे हे जवळचे मार्ग असल्याने या दोन्ही मार्गावरून दोन्ही राज्यातून मोठ्या प्रमाणात वाहतूक व दळणवळणासाठी वापर होतो. मात्र गेल्या तीन चार दिवसापासून सुरू असलेल्या संततदार पावसामुळे दूधगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे या नदीवरील हे दोन्ही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरून होणारी वाहतूक बंद झाली असून दोन्ही राज्यातील नागरिकांना किमान पाच ते सात किलोमीटर लांब पल्याने वाहतूक करावी लागत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news