राशिवडे : पुढारी वृतसेवा : भोगावती साखर कारखान्याच्या दुपारी २ वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीत कौलव गटातील सत्तारूढ आघाडीचे धीरज डोंगळे व राजाराम कवडे हे तर विरोधी आघाडीचे नेते धैर्यशील पाटील हे आघाडीवर आहेत.
दुपारी २ वाजेपर्यंतच्या मतमोजणीनुसार धैर्यशील पाटील – ४२०९, धीरज डोंगळे – ४१७० तर राजू कवडे यांना ४०९० मते मिळाली आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या कौलवकर पॅनेल आणि सत्तारूढ आघाडीमध्ये सुमारे १३०० मतांचा फरक आहे. मतमोजणी सुरू झाली तेव्हा ३६ टेबलवर सर्व उमेदवारांची मतमोजणी होईल असा अंदाज होता. मात्र प्रत्येक गटातील गटनिहाय मतमोजणी सुरू झाल्याने ही प्रक्रिया अत्यंत संथ आणि उशिरापर्यंत चालेल असा अंदाज आहे. आतापर्यंत कौलव मतदारसंघ गटातील उमेदवारांची मतमोजणी ३६ गावात केंद्रांची झाली. आता राशिवडे गटातील उमेदवारांची मतमोजणी सुरू झाली आहे. त्यानंतर तारळे, कुरुकली, सडोली आणि हसूर गटातील उमेदवारांची मतमोजणी होईल. त्यानंतर उर्वरित ४५ केंद्रांची मतमोजण होईल. उशीरा पर्यंत ही मतमोजणी राहणार आहे.
हेही वाचा :