कोल्‍हापूर : वडणगेत ‘सुनबाईं’साठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; सरपंच पदासाठी रंगणार चुरस

कोल्‍हापूर : वडणगेत ‘सुनबाईं’साठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; सरपंच पदासाठी रंगणार चुरस

वडणगे (कोल्‍हापूर): पुढारी वृत्तसेवा : वडणगे (ता.करवीर) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी पारंपारिक विरोधक असलेल्या दोन्ही गटातील नेत्यांच्या सुनबाई रिंगणात आहेत. यामूळे नेत्यांसाठी ही लढत प्रतिष्ठेची बनली आहे. शेतकरी सेवा आघाडीकडून सदाशिव पाटील -मास्तर यांची सून संगीता शहाजी पाटील तर ग्रामविकास आघाडीमधून बी.एच. पाटील यांची सून वृषाली रविंद्र पाटील यांच्यात सरपंचपदासाठी लढत होणार आहे. तर अन्य दोन महिला अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत दत्त आसुर्ले पोर्ले साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिव पाटील-मास्तर यांची शेतकरी सेवा मास्तर आघाडी व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी.एच पाटील यांच्या ग्रामविकास आघाडीमध्ये थेट लढत होणार आहे. यावेळी सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने सरपंच पदासाठी मोठी चुरस होणार आहे. दोन्ही नेत्यांच्या सुनबाईच रिंगणात असल्याने या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. प्रतिभा बाबासाहेब पाटील व सुनिता मच्छिंद्र दिंडे या दोन महिला अपक्ष म्हणून रिंगणात असल्या तरी खरा सामना दोन सुनबाईंमध्येच रंगणार आहे. दोनही आघाड्यांनी तरुण व पदवीधर उमेदवारांना संधी दिली आहे.

सदस्यपदाच्या 17 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात आहेत. यात तिघा अपक्षांचा समावेश आहे. यंदाच्या निवडणुकीत दोन्ही आघाड्यांनी सदस्यपदासाठी नव्या चेहर्‍यांना संधी दिली आहे. शेतकरी सेवा आघाडीकडून दोन तर ग्रामविकास आघाडीने एका विद्यमान सदस्याला निवडणुक रिेंगणात पुन्हा उतरवले आहे. मागील थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत बी.एच. पाटील गटाचे सचिन चौगले विजयी झाले होते. या गटाचे सात उमेदवार तर सदाशिव पाटील मास्तर आघाडीने नऊ जागांवर विजय मिळवला होता.

वडणगे येथील एकूण मतदान : 10761, प्रभाग संख्या-6

सदस्य संख्या :  17 , सरपंच निवड – थेट जनतेतून. 44 पैकी 33 उमेदवार तरुण,14 उमेदवार पदवीधर.

हेही वाचा  :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news