कोल्हापूर : भुदरगडच्या अंतुर्ली जंगलात टस्कर हत्तीचे आगमन

कोल्हापूर : भुदरगडच्या अंतुर्ली जंगलात टस्कर हत्तीचे आगमन
Published on
Updated on

कडगाव, पुढारी वृत्तसेवा : भुदरगड तालुक्यातील अंतुर्ली जंगलात पुन्हा एकदा टस्कर हत्तीचे आगमन झाल्याने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुलै महिन्याच्या सुरवातीला टस्कर हत्तीने मेघोली वनहद्दीतून प्रवास करत नवले ते पाळ्याचाहुडा असे मार्ग क्रम केले होते. यानंतर हत्तीने अंतुर्ली जंगल हद्दीतीतून प्रवास करत शिवडाव येथील रेडे ओहळ जंगलात प्रवेश केला होता. आणि या ठिकाणी हा टस्कर हत्ती सुमारे पंधरा दिवस मुक्काम करून परतीचा प्रवास केला होता. पण एका महिन्याने टस्कर हत्तीने परत डेळे,येथून प्रवास करत चाफेवाडी, पाळ्याचाहुडा अनफखुर्द , ताबाळे ते अंतुर्ली जंगल हद्दीतून शिवडाव येथे दाखल झाला आहे.

या परिसरात टस्कर हत्तीने धुमाकूळ घालत पिकांची नासधूस मोठया प्रमाणात केली आहे. भात,ऊस व अन्य काही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. टस्कर रात्रीच्या वेळी शेतीपिकातून जात असल्याने त्याच्या पायांच्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे या टस्कर हत्तींचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या परिसरात गव्यांच्यामुळे शेती पिकांची नेहमीच नुकसान होत असते आता हत्तीने पिकाची नुकसान केल्याने शेतकरी धास्तावाला आहे.

महिन्यापूर्वी देखील हत्तीने याच मार्गावरून प्रवास करत शिवडाव येथील जंगलात सुमारे दहा ते पंधरा मुक्काम ठोकला होता आता पुन्हा आगमन झाल्याने वन खात्याला हत्तीला आजरा तालुक्यात घालवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. दरम्यान वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण वनपाल किरण पाटील वनरक्षक योगेश पाटील श्री पोवार इजेस पिंटो' विजय शिंदे' मनोज पाटील,गणेश लाड,वैभव बेलेकर हे हत्तीवर हालचालीवर लक्ष ठेऊन आहेत.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news