Kolhapur Flood | दूधगंगा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी
Dudhganga river water
दूधगंगा नदीचे पाणी पात्रा बाहेर पडले आहे. file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आज (दि.२४) पाण्याने सरासरी पाणी पातळी गाठलेली आहे. जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पुढील चोवीस तासांमध्ये धरण पायथा विद्युत निर्मिती केंद्र सुरु करून नदीमध्ये १६०० घनफूट प्रतिसेकंद (क्युसेक्स) पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे, असा सतर्कतेचा इशारा दूधगंगा धरण प्रशासनाने दिला आहे.

Dudhganga river water
कोल्हापूर, सांगलीला दिलासा; अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला

20 प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली

दरम्यान, गेल्या आठवड्यापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे 8 राज्य मार्ग आणि 20 प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली गेले आहेत. पर्यांयी मार्गानी वाहतुक सुरू आहे. आजही भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण हे 90 टक्के भरलं आहे. (Kolhapur Flood)

Dudhganga river water
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर कंटेनरचा अपघात

पूरग्रस्त भागातील 157 कुटुंबे सुरक्षित स्थळी स्थलांतरित

जिल्ह्यातील सर्वच नद्या या संत गतीने धोका पातळीकडे वाटचाल करत असल्याने नदीकाठी चिंता वाढली असून, त्यांचे स्थलांतर सुरू केले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूरग्रस्त भागातील 157 कुटुंबे सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आली आहेत. तर 20 मार्गावरील एसटी सेवा बंद असल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाऊस जोरदार सुरु असल्यामुळे आवश्यकता असेल तरच घराबोहर पडा, तसेच पुरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. (Kolhapur Flood)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news