कोल्हापूर, सांगलीला दिलासा; अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला

अलमट्टी धरणातून २ लाख क्युसेकने विसर्ग
Almatti Dam Water level
अलमट्टी धरणPudhari File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर, सांगलीला महापुरापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज (दि.२४) सकाळी साडेनऊ वाजल्यापासून अलमट्टी धरणातून २ लाख क्युसेकपर्यंत विसर्ग वाढवण्यात आला आहे. अलमट्टी धरणात ऑगस्टअखेर जेवढा पाणीसाठा ठेवला पाहिजे तेवढा पाणीसाठा आताच ठेवण्यात आल्याने कोल्हापूर व सांगलीला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. अलमट्टीचा पाणीसाठा कोल्हापूर व सांगलीच्या मुळावर येण्याची चिन्हे आहेत. अलमट्टी धरणातून मंगळवारी रात्रीपासून १ लाख ७० हजार क्युसेक विसर्ग सुरू होता, तो आता ३० हजार क्युसेकने वाढवण्यात आला आहे.

अलमट्टीतून २ लाख ५० हजार क्युसेकने विसर्ग करण्याची मागणी

कोल्हापूर, सांगलीला असणारा महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टीतील पाण्याचा विसर्ग वाढविण्याची मागणी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अलमट्टी धरणात नियम धाब्यावर बसवून पाणीसाठा केला जात आहे. पावसाळा संपताना जेवढी पाणी पातळी धरणात असायला हवी, तेवढा पाणीसाठा या धरणात आताच करण्यात आला असून, त्यामुळे धरणातून विसर्ग वाढविण्यासाठी महाराष्ट्रसरकारने कर्नाटक सरकारशी संपर्कात राहून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची मागणी केली होती. कोल्हापूर, सांगलीचा महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून २ लाख ५० हजार क्युसेकने विसर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे, मात्र सध्या २ लाख क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

पंचगंगेची पूर पातळी 41.9 फुटांवर

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या कोसळधारा सुरूच आहेत. मंगळवारी शहरात दिवसभर पावसाचे धूमशान सुरू होते. गेल्या 24 तासांत राधानगरीसह 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. राधानगरी धरण 90 टक्के भरले असून, धरणातून 1500 क्युसेक विसर्ग सुरू आहे. धुवाँधार पावसामुळे पंचगंगा धोका पातळीजवळ आली आहे. रात्री 12 वाजता पंचगंगेची पाणीपातळी 41 फूट 9 इंचांवर होती. पुराचे पाणी केर्ली रस्त्यावर आल्याने कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील केर्ली ते कोतोली फाटादरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली. शहारात पुराचे पाणी जामदार क्लबपर्यंत आले असून, आतापर्यंत शहरातील शंभारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news