

नागाव : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टोप येथील बिरदेव मंदिराजवळील वळणावर ट्रकने मागून दुचाकीला धडक दिल्याने विवाहिता जागीच ठार व एक गंभीर जखमी झाला. जखमीस सीपीआरमध्ये दाखल केलेे. हा अपघात बुधवारी रात्री 9.30 वाजता घडला असून, या अपघातात दीड वर्षाचा मुलगा थोडक्यात बचावला.
सोनाली शुभम कांबळे (वय 24, रा. बुवाचे वाठार, ता. हातकणंगले) असे मृत तरुणीचे नाव असून, जखमीचे नाव समजू शकले नाही. सोनाली व आत्याचा मुलगा रोहन राजू कांबळे, तर पती, शुभमचा मित्र मोसीम पिंजारी हे दोन मोटारसायकलवरून कोल्हापूर येथे कामानिमित्त गेले होते. ते बुवाचे वठारकडे परतताना सोनालीला सोबत घेऊन येताना अपघात झाला. सीपीआर रुग्णालयात सोनालीच्या सासर व माहेरकडील नातेवाईकांत तीन वेळा हाणामारी झाली. काहींनी सोनालीच्या पतीलाही मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले.