कोल्हापूर : विजेच्या धक्क्याने सावर्डे पाटणकर येथील युवकाचा पुण्यात मृत्यू

कोल्हापूर : विजेच्या धक्क्याने सावर्डे पाटणकर येथील युवकाचा पुण्यात मृत्यू
Published on
Updated on

सरवडे; पुढारी वृत्तसेवा : सावर्डे पाटणकर (ता.राधानगरी) येथील सुधीर तुकाराम पोवार (वय ४०) यांचा चिंचवड पुणे येथे विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. सुधीर हा पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरीला होता.

तो आपली ड्युटी संपवून घरी आल्यानंतर घराच्या गॅलरी शेजारुन गेलेल्या विद्युत वाहक तारेवर टॉवेल पडलेला होता. टॉवेल काढत असताना विजेचा जोरदार शॉक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. सुधीरने अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून प्रपंच उभारला होता. तोवर काळाने त्याच्यावर घाला घातला. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news