कोल्हापूर: काळम्मावाडी परिसरात तरसाच्या हल्ल्यात २ शेळ्यांसह ३ बकरी ठार

कोल्हापूर: काळम्मावाडी परिसरात तरसाच्या हल्ल्यात २ शेळ्यांसह ३ बकरी ठार

मिणचे खुर्द, पुढारी वृत्तसेवा: भुदरगड तालुक्यातील हेदवडे पैकी काळम्मावाडी जंगल परिसरात तरसाने केलेल्या हल्ल्यात २ शेळ्यांसह ३ बकरी ठार झाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बंडू गुंडू खोत (रा. हेदवडे पैकी काळम्मावाडी) हे रानामध्ये शेळ्या चरत होते. यावेळी तरस या वन्य प्राण्यांने शेळीच्या कळपावर हल्ला केला. यात दोन शेळ्या व तीन बकरी ठार झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ वनपाल मारुती डवरी, संजय चौगुले, विजय खोत (माजी सरपंच) यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

हेदवडे गिरगाव हा परिसर राधानगरी अभयारण्यास लागून आहे. त्यामुळे या ठिकाणी सांबर, बिबट्या, तरस, जंगली कुत्रा (वाईल्ड डॉग) अशा प्रकारचे वन्य प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे ग्रामस्थांनी आपली जनावरे घेवून लांब रानात सहसा जावू नये, वसाहतीच्या आसपास चराई करावी, असे आवाहन वनपाल मारुती डवरी यांनी केले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news