कोल्‍हापूर : इचलकरंजी येथील न्यायाधीश आर. एन. आंबटकर यांचे निधन

न्यायाधीश आर. एन. आंबटकर यांचे निधन
न्यायाधीश आर. एन. आंबटकर यांचे निधन
Published on
Updated on

यड्राव : पुढारी वृत्तसेवा इचलकरंजी येथील अतिरिक्त जिल्हा तथा सत्र न्यायाधीश आर. एन. आंबटकर यांना मोटरसायकलने धडक दिल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. 17 दिवसांपासून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान त्यांचे आज सकाळी निधन झाले. अपघाती निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी दोन मुली असा परिवार आहे.

न्यायाधीश आंबटकर हे यड्राव येथील पार्वती विद्यामंदिर जवळ राहतात. मंगळवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे यड्राव जांभळी मार्गावर पायी फिरायला गेले होते. यावेळी अनिल रामचंद्र जाधव रा. जांभळी याने मोटरसायकल क्र. MH-09-DD-9645 बजाज डिस्कव्हर दुचाकी भरधाव वेगात चालवुन आंबटकर यांना जोराची धडक दिली होती. त्यात ते गंभीर जखमी होते. त्यांना उपचारासाठी तातडीने इचलकरंजी व तेथून कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले.

त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करून उपचार सुरू केले. मात्र आठ दिवसांपूर्वी त्यांचा ब्रेन डेड झाला. तरीही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले, मात्र याला यश आले नाही. त्यांचे आज सकाळी निधन झाले. न्यायमूर्ती आंबटकर यांचे पुणे जिल्ह्यातील मंचर हे मूळ गाव आहे. ते जून 2022 मध्ये इचलकरंजी येथे न्यायाधीश म्हणून रुजू झाले होते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news