मोबाईलचा नाद पडला महागात ! पाचव्या मजल्यावरून पडून गेला युवतीचा जीव | पुढारी

मोबाईलचा नाद पडला महागात ! पाचव्या मजल्यावरून पडून गेला युवतीचा जीव

सासवड : सासवड येथील बांधकाम व्यावसायिक सुनीलनाना जगताप कुटुंबासह उत्तम सोसायटीमागील जागेत स्वतःच्या नव्या इमारतीची पाहणी करण्यासाठी गेले असता, फोन आल्यामुळे गडबडीत त्यांची कन्या अनुष्का जगताप (वय २१) खाली येत असताना पाचव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २ एप्रिल रोजी त्यांच्या उत्तम सोसायटीच्या मागील जागेत त्यांच्या स्वतःच्या इमारतीमध्ये घडली.

अपघातानंतर तिला पुण्याच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ४एप्रिलला तिचा मृत्यू झाला. अनुष्काने सासवडच्या वाघिरे महाविद्यालयातून बी.एस्सी. पदविका पूर्ण केली होती. तिच्या निधनाने सासवडसह त्यांच्या मूळ गावात ताथेवाडी येथे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक शरद जगताप यांची अनुष्का पुतणी होती.

Back to top button