IPS Birdev Done : नऊवारीतील आई, घोंगडं पांघरलेला बाप अन्‌‍ आकाशाला गवसणी घालणारी स्वप्नं

आयपीएस बिरदेव डोणे यांनी आई-वडिलांना घडवला पहिलाच विमानप्रवास
IPS Birdev Done
नऊवारीतील आई, घोंगडं पांघरलेला बाप अन्‌‍ आकाशाला गवसणी घालणारी स्वप्नं
Published on
Updated on

कोल्हापूर ः आकाशात झेपावणारे विमान पाहणेही अनेकांसाठी स्वप्न असतं; पण त्याच विमानाच्या पायऱ्या चढत त्यातून प्रत्यक्ष प्रवास करणे... तेही आयुष्यभर कष्ट करणाऱ्या आई-वडिलांसोबत हा क्षण शब्दांच्या पलीकडचा ठरतो. कोल्हापूरच्या मातीत जन्मलेल्या मेंढपाळ कुटुंबातील भारतीय पोलिस सेवेतील आयपीएस अधिकारी बिरदेव डोणे यांच्या आयुष्यात हा भावस्पर्शी क्षण नुकताच साकार झाला आहे.

IPS Birdev Done
Birdev Done UPSC Success Story । भावा तू जिंकलास! यूपीएससी क्रॅक, तरी मेंढरं चारत होता मंडोळीच्या माळावर

यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवत आयपीएस पदावर निवड झाल्यानंतर बिरदेव डोणे यांचे देशभरात कौतुक झाले. मात्र, या यशाचा खरा आनंद त्यांनी आई-वडिलांसोबत वाटला, त्यांना आयुष्यात पहिल्यांदाच विमान प्रवास घडवून. ते सध्या हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अकॅडमीत प्रशिक्षण घेत आहेत. याच प्रशिक्षण केंद्राला भेट देण्यासाठी त्यांनी आई वडिल आणि कुटुंबीयांना सोबत नेले होते. इंडिगो विमानातून झालेला हा प्रवास त्याच्या आई-वडिलांसाठी पहिलाच विमान प्रवास आहे.

नऊवारी साडी व नाकात मोठी नथ घातलेली आई आणि अंगावर घोंगडे घेतलेल्या वडिलांनी विमानतळावर आणि विमानात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. साधेपणात दडलेला आत्मविश्वास, चेहऱ्यावरील समाधान आणि डोळ्यांतून ओसंडून वाहणारा अभिमान हे दृश्य अनेकांना भावूक करून गेले. या अनुभवाविषयी सोशल मीडियावर भावना व्यक्त करताना डोणे लिहितात, ज्या दिवसांपासून मी फक्त विमान पाहण्याची स्वप्न पाहात होतो, तेथून आज माझ्या आई-वडिलांना त्या विमानाच्या पायऱ्या चढताना पाहणे इथंपर्यंतचा प्रवास हा क्षण शब्दांत मांडणे कठीण आहे. विलास नाही... दिखावा नाही.... फक्त कृतज्ञता. त्यांचे हास्य म्हणजेचं माझे यश.

मान उंचावून आकाशात उडणारी विमाने पाहणारी गावाकडची पोरं जेव्हा आपल्या आई-वडिलांना विमानप्रवास घडवतात, तेव्हा तो प्रवास फक्त दोन शहरांमधला राहात नाही. तो त्यांच्या संघर्षाचा, आई-वडिलांच्या त्यागाचा आणि पिढ्यान्‌‍पिढ्यांच्या स्वप्नांचा उत्सव बनतो आहे. बिरदेव डोणे यांच्या कुटुंबाचा हा पहिला विमानप्रवास आज असंख्य तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

IPS Birdev Done
मी साधा माणूस; मला साधेच राहू द्या : यूपीएससी उत्तीर्ण बिरदेव डोणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news