पेठवडगाव : आंतरराष्ट्रीय निवड चाचणीमध्ये अभिज्ञा पाटील हिने पटकाविले रौप्यपदक

पेठवडगाव : आंतरराष्ट्रीय निवड चाचणीमध्ये अभिज्ञा पाटील हिने पटकाविले रौप्यपदक
Published on
Updated on

पेठवडगाव; पुढारी वृत्तसेवा : येथील आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू कु.अभिज्ञा अशोक पाटील हिने नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय निवड चाचणी १ व २ मध्ये प्रत्येकी रौप्यपदक पटकाविले. महिलांच्या वरिष्ठ गटात अभिज्ञा १० मीटर एअर पिस्टल २५ मीटर रॅपिड फायर पिस्टल आणि २५ मी. स्पोर्ट पिस्टल या खेळ प्रकारात खेळते. दरम्यान, ही निवड चाचणी ७ जानेवारी २०२३ ते १४ जानेवारी २०२३ पर्यंत डॉ. करणीसिंग शूटिंग रेंज, नवी दिल्ली येथे संपन्न झाली.

अभिज्ञाने महिलांच्या वरिष्ठ गटात ०.२२ स्पोर्ट पिस्टल २५ मीटर या खेळ प्रकारात आंतरराष्ट्रीय निवड चाचणी क्रमांक १ आणि २ मध्ये ६०० पैकी ५७८ व ५७५ गुणांची कमाई करत अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत १ रौप्यपदकाची कमाई केली. या यशस्वी घोडदोडीमुळे तिचा भारतीय नेमबाजी संघटनेच्या अव्वल खेळाडूमध्ये समावेश झाला आहे.

         हेही वाचलंत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news