गडहिंग्लज : कॅफेत अश्लील चाळे

कॅफेमध्ये अश्लील चाळ्यांचा वाढता प्रकार; पालकांची चिंता
increasing indecent acts in cafes
कॅफेमध्ये अश्लील चाळ्यांचा वाढता प्रकार.Pudhari File Photo

प्रवीण आजगेकर

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहराची ओळख ही शिक्षणाचे हब म्हणून होत असताना काही अवैध धंद्यांनीही याचा पाठलाग करत आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचे काम केले आहे. मंगळवारी अशाच प्रकारे एक अल्पवयीन मुलगी बलात्कारातून गर्भवती झाल्याचा गुन्हा नोंद झाल्यानंतर खळबळ उडाली असून यामध्ये चक्क कॅफेमध्ये या दोघांचे संबंध आल्याचे उघड झाल्याने आता पालकांकडूनही चिंता व्यक्त होऊ लागली आहे. खरे तर अशा प्रकारे कॅफेमध्ये सेवा सुविधा उपलब्ध होत असतील तर मग या सर्वाला जबाबदार तरी कोण, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

increasing indecent acts in cafes
खाऊचे आमिष दाखवून ९ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून

गडहिंग्लज शहरामध्ये जसजशी शिक्षणाची कवाडे उघडत गेली, तसतशी ही कॅफेचीही दुकाने जोरात उघडत आहेत. यातील काही कॅफेनी केवळ खाद्यसंस्कृतीवर भर देऊन ग्राहकांना आकर्षिक करून आपला व्यवसाय सांभाळला आहे. काहींनी मात्र खाद्यसंस्कृती बाजूला ठेवत केवळ वेगळ्या संस्कृतीचा वापर करत अश्लील चाळ्यांना जागा देत ग्राहकांना आकर्षित केले आहे. हे ग्राहक म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून बहुसंख्य वेळा महाविद्यालयीन युवक-युवतींसह आता शाळकरी मुले-मुलीही येेऊ लागल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.

increasing indecent acts in cafes
कुकाण्यात अतिक्रमित बांधकामावरून राडा; कार्यकर्त्यांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून

खरे तर कॅफे असावेत. चहा, कॉफी व अन्य पदार्थ खाण्यासाठी या जागा नक्कीच पाहिजेत. मात्र याच्या आडून सुरू असलेले नसते उद्योग बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेकांनी आलेल्या जोडप्यांना प्रायव्हसी मिळावी म्हणून केलेले नियोजन तसेच त्या ठिकाणाहून अन्य ठिकाणी जाण्याची केलेली सोय यामुळेच अशी प्रकरणे घडत असून आता यावर केवळ पोलिसांनी नाही तर पालकांनीही लक्ष ठेवणे आवश्यक आहे. पोलिसांनीही अशा प्रकारच्या कॅफेवर कडक कारवाई करण्याची गरज असून, जेणेकरून केवळ खाद्यसंस्कृतीचे कॅफे सुरू राहतील.

increasing indecent acts in cafes
बीड : भरधाव वाहनाच्या धडकेत दिंडीतील वारकरी ठार

लॉजपेक्षा भन्नाट सेवा...

केवळ गडहिंग्लज शहरामध्येच नाही तर आता उपविभागातील अनेक मोठ्या खेड्यांमध्येही अशा प्रकारचे कॅफे सुरू झाले असून अनेक ठिकाणी लॉजपेक्षा भन्नाट सेवा दिल्या जात असल्याने अशा ठिकाणी ही अल्पवयीन जोडपी जाणे पसंत करत आहेत. यातून होणार्‍या घटनांमुळे मात्र समाजमनावर नक्कीच परिणाम होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news