Gokul Election | 'गोकुळ'च्या अवसायनातील संस्थांचा संघर्ष अद्यापही सुरूच! कोल्हापूर, पुणे सहनिबंधक कार्यालयावर धडक

मतदार यादीत समावेश होण्यासाठी संस्थांना पुन्हा संघर्ष करावा लागणार असल्याची चिन्हे
Kolhapur Gokul Dudh Sangh Election
Kolhapur Gokul Dudh Sangh ElectionPudhari
Published on
Updated on

Gokul Milk Sangha Election

आशिष ल. पाटील

गुडाळ : अवसायनातील कारवाई रद्द व्हावी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालय ते विभागीय सहनिबंधक कार्यालयापर्यंत आणि सहकार न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत संघर्ष करणाऱ्या गोकुळच्या शेकडो संलग्न दूध संस्थांचा संघर्ष अवसायनातील कारवाई रद्द होऊनी थांबलेला दिसत नाही. मतदार यादीत समावेश होण्यासाठी या संस्थांना पुन्हा संघर्ष करावा लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान,उच्च न्यायालयात अवसायनाची कारवाई रद्द झालेल्या 194 संस्थांच्या प्रतिनिधींनी आज सोमवारी (दि.१७) दुपारी सहाय्यक निबंधक (दुग्ध ),कोल्हापूर यांच्या कार्यालयावर तर उर्वरित 300 दुध संस्थांमधील काही संस्था प्रतिनिधींनी उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे आम्हालाही आजच न्याय मिळावा, यासाठी विभागीय सहनिबंधक( दुग्ध )पुणे यांच्या कार्यालयावर सोमवारीच धडक मारण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Kolhapur Gokul Dudh Sangh Election
Gokul Election : गोकुळच्‍या अवसायनातील तीनशे संस्‍थांचा आज निर्णय

अवसायनातील 194 संस्था वरील कारवाई सर्किट बेंच ने रद्द केली असली तरी या संस्थांचा मतदार यादीत समावेश करण्याबाबत कोणताही स्पष्ट आदेश दिला नसल्याचे, शिवाय न्यायालयाचा हा निर्णय संबंधित प्राधिकरणांना कायद्यानुसार चुका करणाऱ्या प्राथमिक संस्था विरुद्ध पुढील कारवाई करण्यास प्रतिबंध करणार नाही असे न्यायालयाच्या आदेशात स्पष्ट नमूद केले असल्याचे सहकार विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वेळेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची असल्याने पुन्हा या संस्थांची ठराव मागणी प्रक्रिया वेळखाऊ ठरेल असा अधिकाऱ्यांचा युक्तिवाद असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र, अवसायनातील बहुतांश संस्थांनी यापूर्वीच आपले ठराव दाखल करून सहाय्यक निबंधक कार्यालयाची पोहच ही घेतल्याने शिवाय कारवाई रद्द झाल्याने या संस्थांचा मतदार यादीत समावेश करणे क्रमप्राप्त असल्याचे काही विधिज्ञांचे मत आहे.

Kolhapur Gokul Dudh Sangh Election
Gokul Politics | अवसायनातील दूध संस्‍था बदलणार ‘गोकुळ’चे राजकारण

या पार्श्वभूमीवर प्रारूप यादीत 194 संस्थांचा समावेश करावा यासाठी यापूर्वी दिलेल्या ठरावाची प्रत आणि पोहोच घेऊन या संस्था प्रतिनिधींनी सहाय्यक निबंधक (दुग्ध) कृष्णा ठाकरे यांच्या कार्यालयावर सोमवारी दुपारी धडक मारण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

तर 14 ऑगस्ट रोजी झालेल्या पुणे येथे झालेल्या अवसायनातील संस्थांच्या सुनावणीचा निकाल सोमवारीच द्यावा आणि तो उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणेच द्यावा, या मागणीसाठी संबंधित संस्था प्रतिनिधी सोमवारीच पुणे येथील विभागीय सहनिबंधक देविदास मिसाळ यांच्या कार्यालयावर सकाळी 11 वाजता धडक मारणार आहेत असे सांगण्यात येत आहे. एकंदरीत अवसायनातील संस्थांचा संघर्ष अद्यापही संपलेला नाही असे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news