Gokul Election : गोकुळच्‍या अवसायनातील तीनशे संस्‍थांचा आज निर्णय

त्‍या ४१० दूध संस्‍थांनाही आज म्‍हणणे सादर करावे लागणार
Gokul Milk  |
Gokul Milk |
Published on
Updated on

कोल्‍हापूर : गोकुळ संलग्‍न अवसायनातील तीनशे संस्‍थांबाबत आज निर्णय होण्‍याची शक्‍यता आहे. विभागीय उपनिबंधकांसमोर संस्‍थांची सुनावणी पूर्ण झाली असून त्‍यांनी निर्णय दिलेला नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या निर्णयाकडे संस्‍थांचे लक्ष असणार आहे. तसेच सभासदत्व रद्द करण्‍यासंदर्भातील ४१० दूध संस्‍थांना आज सहकार न्‍यायालयात म्‍हणणे सादर करावे लागणार आहे. तर उद्या मंगळवारी (दि.१८) सुनावणी होणार आहे.

गोकुळच्‍या १९३ दूध संस्‍थांचा अवसायनाचा अंतिम आदेश मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या कोल्‍हापूर सर्किट बेंचने रद्द केला होता. त्‍यामुळे अवसायनातील दूध संस्‍थांना दिलासा मिळाला आहे. अवसायनातील अन्‍य तीनशे संस्‍थांनीही सहाय्‍यक निबंधक कृष्‍णा ठाकरे यांच्‍या निर्णयाविरोधात विभागीय उपनिबंधक यांच्‍याकडे अपील केले होते. त्‍यांच्‍या अपीलवर सुनावणी पूर्ण झाली असून विभागीय उपनिबंधकांनी निर्णय दिलेला नाही. ते आज निर्णय देण्‍याची शक्‍यता आहे.

त्‍याचबरोबर गोकुळने ४१० दूध संस्‍थांना चुकीच्‍या पध्‍दतीने सभासदत्व दिल्‍याची तक्रार प्रकाश बेलवाडे यांनी केली असून या संस्‍थांचे सभासदत्व रद्द करण्‍यासंदर्भातील याचिका त्‍यांनी सहकार न्‍यायालयात दाखल केली आहे. यावर सोमवारपर्यंत (दि. १७) संबंधित संस्‍थांना मुदत दिली आहे. त्‍यामुळे संबंधित संस्‍थांना आज म्‍हणणे सादर करावे लागणार आहे. तर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news