Gokul Election: "मत आम्हालाच द्या...!" 'गोकुळ'च्या मतदारांना बारामतीतून आले फोन; नेमका घोळ काय?

गोकुळ मतदारांच्या मोबाईलवर पुणे जिल्ह्यातील बारामती येथील सोमेश्वर साखर कारखान्याच्या एका पॅनलच्या प्रचाराचे व्हॉइस मेसेज येत असल्याने मतदार अवाक झाले आहेत.
Gokul Election
Gokul ElectionFile Photo
Published on: 
Updated on: 

Gokul Election

गुडाळ : आशिष पाटील

गोकुळच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मतदारांच्या मोबाईलवर दिवस-रात्र येणाऱ्या उमेदवारांच्या व्हॉइस मेसेज मुळे मतदार त्रस्त झालेले असतानाच या मतदारांच्या मोबाईलवर पुणे जिल्ह्यातील बारामती येथील सोमेश्वर साखर कारखान्याच्या एका पॅनलच्या प्रचाराचे व्हॉइस मेसेज येत असल्याने मतदार अवाक झाले आहेत.

गोकुळच्या निवडणुकीत मतदारांशी व्हीजिटिंग कार्ड, प्रचार पत्रक,भेटवस्तू देऊन थेट संपर्क साधण्याबरोबरच मोबाईलवर कॉल द्वारा उमेदवारांच्या आवाजात व्हॉइस मेसेज करूनही संपर्क साधला जात आहे. याच दरम्यान पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचीही रणधुमाळी सुरू आहे.

Gokul Election
Gokul Election | विरोधकांना आताच ‘पी. एन.’ गटाचा पुळका का आला?

गोकुळच्या मतदारांच्या साठी करण्यात येणाऱ्या व्हॉइस मेसेज चे काम ज्या सॉफ्टवेअर कंपनीकडे आहे त्याच कंपनीकडे सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीतील एका पॅनेलने आपलेही काम देऊन मतदार यादी दिली आहे.

संबंधित कंपनीच्या डाटा ऑपरेटरने नजरचुकीने सोमेश्वर साखर कारखान्याच्या यादीत गोकुळच्या मतदार यादीचा काही डाटा अपलोड केला आहे. त्यामुळे गेले दोन-तीन दिवस गोकुळच्या ठराव धारकांना सोमेश्वर साखर कारखान्याच्या एका पॅनलच्या प्रचाराचे व्हॉइस कॉल येत आहेत.

योगायोग म्हणजे सोमेश्वर कारखान्याच्या त्या पॅनलचे चिन्ह गोकुळच्या एका पॅनलचेच चिन्ह आहे. त्यामुळे आपसूकच आपल्या पॅनल च्या चिन्हाचा फुकटात प्रचार होत असल्याने संबंधित पॅनलचे उमेदवार मात्र खुश आहेत. मतदार मात्र दूध आणि साखरेच्या या व्हॉइस मेसेज मुळे त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.

Gokul Election
Gokul Election | गोकुळ : ‘समविचारी’समोर ‘महायुती’चे तगडे आव्‍हान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news