Gokul election | मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री मुश्रीफ यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

आमदार शिवाजीराव पाटील; मुश्रीफ यांच्याशी मतभेद संपले
Gokul election | मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री मुश्रीफ यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
Published on: 
Updated on: 

महागाव : येथील प्रचार सभेत दूध उत्पादक सभासदांसमोर बोलताना आमदार शिवाजीराव पाटील, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील आणि माजी आमदार राजेश पाटील.

महागाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असेल. मंत्री हसन मुश्रीफ आणि माझ्यातील सर्व मतभेद संपले असून, महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या रक्तात गद्दारी नाही. एकदा शब्द दिला की, त्यात बदल होत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पॅनेल टू पॅनेल मतदान करणार असल्याची ग्वाही आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिली.

महागाव (ता. गडहिंग्लज) येथे गोकुळच्या निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आमदार शिवाजीराव पाटील आणि आमच्यात काही मतभेद होते. तसेच शौमिका महाडिक यांनीही आपली बाजू मांडली होती. मात्र, आता आमच्यातील सर्व मतभेद गंगेला मिळाले आहेत. या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.

गोकुळ हा ब्रँड एका दिवसात तयार झालेला नाही. त्यासाठी अनेक नेत्यांनी खस्ता खाल्ल्या आहेत. माजी मंत्री भरमूअण्णा पाटील म्हणाले, गोकुळ दूध संघ राज्यातच नव्हे, तर देशात प्रथम क्रमांकावर यावा, अशी भूमिका महायुतीच्या नेत्यांनी घेतली आहे. यावेळी खा.धनंजय महाडिक, संजय घाटगे, राजेश पाटील, नंदाताई बाभूळकर, सुजित मिणचेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

विरोधकांना टप्पा गाठणे अशक्य

महायुतीच्या मतदारांची संख्या पाहता विरोधकांना विजयासाठी आवश्यक असलेला टप्पा गाठणे अशक्य आहे. त्यामुळे मतदारांनी आपली मते वाया घालवू नयेत. महायुतीच्या सर्व २५ उमेदवारांना मतदान करून विजयी करावे, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.

Gokul election | मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री मुश्रीफ यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
Kolhapur Chitranagari Film City | कोट्यवधी खर्चूनही कोल्हापूर चित्रनगरी दुर्लक्षित! दीड वर्षांनंतरही निर्मात्यांच्या बैठकीला मुहूर्त मिळेना

मुश्रीफ विजयाचे तंत्र दाखवतील...

मंत्री मुश्रीफ गेली २५ ते ३० वर्षे मंत्रिपदावर कार्यरत आहेत. त्यांच्यासमोर राजकारणातील माझा अनुभव सांगणे योग्य नाही. निवडणुका कशा जिंकायच्या, हे मागील जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी आम्हाला दाखवून दिले. गोकुळच्या निवडणुकीतही ते विजयाचा मार्ग दाखवतील, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

Gokul election | मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री मुश्रीफ यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
Kolhapur Moneylenders Case | कोल्हापूर परिक्षेत्रातील ३२३ सावकारांना बेड्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news