Kolhapur Chitranagari Film City | कोट्यवधी खर्चूनही कोल्हापूर चित्रनगरी दुर्लक्षित! दीड वर्षांनंतरही निर्मात्यांच्या बैठकीला मुहूर्त मिळेना

Kolhapur Chitranagari Film City | महाराष्ट्रातील चित्रपटसृष्टीच्या नकाशावर आणण्याची घोषणा हवेतच, निर्मात्यांच्या बैठकीला मुहूर्त मिळेना
Kolhapur Chitranagari
Kolhapur Chitranagari Film CityPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : अनुराधा कदम

कोल्हापूर चित्रनगरीत चित्रीकरणाला चालना देण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यातील चित्रपटनिर्माते आणि निर्मिती संस्थांची व्यापक बैठक घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, घोषणेला दीड वर्षाचा कालावधी उलटूनही या बैठकीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.

Kolhapur Chitranagari
Kolhapur News| ब्रँडिंगसाठी ‘कोल्हापूर महोत्सव’सारखे उपक्रम राबवा

त्यामुळे कोट्यवधींचा निधी खर्च करून विकसित होत असलेल्या चित्रनगरीला राज्यातील निर्मात्यांपर्यंत पोहोचविण्याचा महत्त्वाचा टप्पा रखडला असून, ऐतिहासिक चित्रनगरी निर्मात्यांच्या प्रतीक्षेत आहे. चित्रनगरीच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देतानाच येथे अधिकाधिक चित्रपट, मालिका आणि अन्य दृकश्राव्य निर्मितीचे चित्रीकरण व्हावे,

हा उद्देश ठेवण्यात आला आहे. त्यासाठी मुंबई-पुण्यापुरती मर्यादित असलेली निर्मितीव्यवस्था कोल्हापूरकडे वळविण्याच्या दृष्टीने निर्मात्यांशी थेट संवाद साधणे आवश्यक आहे. चित्रनगरीतील उपलब्ध लोकेशन्स, प्रस्तावित सुविधा, भाडेदर, तांत्रिक सोयी आणि भविष्यातील विकासकामांची माहिती निर्मात्यांना देण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात होती.

सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांनी निर्मात्यांची व्यापक बैठक घेण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर विविध पातळ्यांवर चित्रनगरीच्या विकासाबाबत चर्चा होत असली तरी निर्मात्यांना एकत्रित करून त्यांच्याशी संवाद साधणारी बैठक अद्याप झालेली नाही.

दरम्यान, चित्रनगरीत काही मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी विचारणा होत आहे. मात्र, आवश्यक सुविधा, सेट उभारण्यासाठी उपलब्ध फ्लोअर आणि अन्य चित्रीकरणपूरक साधनसामग्रीचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे निर्मात्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या नेमक्या गरजा समजून घेणे आणि त्यानुसार चित्रनगरीतील सुविधा विकसित करणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.

Kolhapur Chitranagari
Kolhapur News | कोल्हापूर सर्किट बेंचसाठी स्वतंत्र ४५९ पदे भरणार

या मुद्द्यांवर चर्चा आवश्यक:

१. निर्मात्यांच्या गरजा : मालिका, चित्रपट आणि वेबमालिकांसाठी नेमक्या कोणत्या सुविधा हव्या आहेत?
२. उपलब्ध लोकेशन्स : कोणती लोकेशन्स तत्काळ वापरता येतील आणि कोणती पूर्ण करण्याची गरज आहे?
३. चित्रीकरण पॅकेज : लोकेशन, फ्लोअर, साहित्य आणि तांत्रिक सुविधांचे एकत्रित पॅकेज देता येईल का?
४. सातत्यपूर्ण संपर्क : निर्मात्यांना चित्रनगरीशी जोडण्यासाठी स्वतंत्र संपर्क व समन्वय यंत्रणा उभारता येईल का?

"निर्मात्यांची बैठक केवळ औपचारिक न राहता तिच्यातून चित्रनगरीसाठी ठोस कृती आराखडा निश्चित होण्याची अपेक्षा आहे. कोणत्या प्रकारची लोकेशन्स आणि स्टुडिओ सुविधा निर्मात्यांना हव्या आहेत, कोणत्या सुविधा तातडीने उपलब्ध करून देता येतील, चित्रीकरणासाठी सवलती अथवा पॅकेज देता येईल का, यावर निर्णय झाल्यास चित्रनगरीच्या वापराला चालना मिळू शकते."

- आनंद काळे, संचालक, महालक्ष्मी सिने सर्व्हिसेस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news