Kolhapur Moneylenders Case | कोल्हापूर परिक्षेत्रातील ३२३ सावकारांना बेड्या

सावकारी टोळ्यांचा पश्चिम महाराष्ट्रात धुमाकूळ; दहशतीच्या बळावर दडपशाही
Kolhapur Moneylenders Case |
Kolhapur Moneylenders Case | कोल्हापूर परिक्षेत्रातील ३२३ सावकारांना बेड्या
Published on: 
Updated on: 

दिलीप भिसे

कोल्हापूर : गुंडशाही आणि जोर जबरदस्तीच्या बळावर सामान्य घटकांसह कष्टकऱ्यांची पिळवणूक करून सोन्यासारख्या जमिनी, मालमत्तांवर फणा काढणाऱ्या सावकारी टोळ्यांनी कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. जानेवारी २०२४ ते सप्टेंबर २०२६ काळात सावकारी अधिनियमांतर्गत १३४ गुन्ह्यांत ३२३ सावकारांना जेलचा रस्ता दाखविण्यात आला आहे. सर्वाधिक सोलापूरपाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात अनुक्रमे ८७ अन्‌ ५२ सावकारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात सावकारशाहीचे साम्राज्य!

कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत सोलापूर ग्रामीण क्षेत्रात विशेषत: सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, अकलूज, बार्शी परिसरात खासगी सावकारांनी धुमाकूळ घातला आहे. पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात ३१ गुन्ह्यांत ५२ सावकारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पुणे ग्रामीण २९ गुन्हे, ८७ आरोपी, सातारा १६ गुन्ह्यांत ३७ संशयितांना जेरबंद करण्यात आले आहे. तर सांगली जिल्ह्यात १२ गुन्ह्यांत २६ सावकारांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

समाजातील गरजू, कष्टकऱ्यासह आर्थिक दुर्बल घटकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन पिळवणूक करणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध कारवाईचे आदेश आहेत. समाजकंटकाकडून आर्थिक पिळवणूक होत असल्यास संबंधितांनी निर्भयपणे पुढे यावे.

रंजनकुमार शर्मा, विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news