Gokul Election 2026: जोरदार शक्तीप्रदर्शन करत हसन मुश्रीफ गटाकडून गोकुळ निवडणुकीचे ठराव दाखल

Hasan Mushrif on Satej Patil
Hasan Mushrif on Satej Patil Pudhari
Published on
Updated on

Gokul Election 2026: गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफांच्या गटाकडून आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत ठराव दाखल करण्यात आले. निबंधक कार्यालयात ठराव दाखल करण्यासाठी मुश्रीफ गटाचे सर्वजण दाखल झाले होते. यावेळी मुश्रीफ गटाकडून १,९७१ ठराव दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून मुश्रीफ गटाने हे ठराव दाखल केले आहेत.

Hasan Mushrif on Satej Patil
Gokul Election | ‘गोकुळ’च्या ठरावांसाठी शक्तिप्रदर्शनाची तयारी

मुश्रीफ गटाचे तालुकानिहाय ठराव

  • करवीर 223

  • राधानगरी 384

  • कागल 284

  • भुदरगड 213

  • चंदगड 165

  • गडहिंग्लज 222

  • शिरोळ 165

  • शाहूवाडी - 42

  • आजरा 152

  • पन्हाळा - 50

  • हातकणंगले 67

  • गगनबावडा 4

Hasan Mushrif on Satej Patil
Gokul Election | आ. शिवाजी पाटील महायुतीसोबत की, सतेज पाटलांच्या गळाला?

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवरती प्रत्येक गट आपापले ठराव दाखल करत असतानाच आज मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामार्फत त्यांच्या संपूर्ण गटाचे ठराव शक्ती प्रदर्शन करत एकत्रित दाखल करण्यात आले. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सर्वजण आपापल्या गटाचे ठराव दाखल करत आहेत. त्यापैकी काही ठरावासंदर्भात आणि दूध संस्था संदर्भात अद्याप अंतिम निकाल बाकी आहे..

एकीकडे हसन मुश्रीफ महायुतीच्या माध्यमातून आपल्या गटाचे ठराव दाखल करत आहेत. दुसरीकडे गेल्यावेळचे सत्तेतील सहकारी मात्र आता विरोधात असलेल्या आमदार सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या माध्यमातून महायुतीच्या विरोधात शड्डू ठोकला आहे.

Hasan Mushrif on Satej Patil
Gokul Election | ठरावावरून करवीर तालुक्यातील संस्था कारभाऱ्यांमध्ये चढाओढ

आज हसन मुश्रीफ शक्ती प्रदर्शनाने ठराव दाखल करणार आहेत त्याच ठिकाणी सतेज पाटील यांच्या गटाकडून बॅनरबाजी करण्यात आलीये. म्हशीच्या दुधाला 14 रुपये आणि गायीच्या दुधाला 10 रुपये दरवाढ मागील पाच वर्षात दूध उत्पादकांना दिली असल्याचे सांगत यावेळी गोकुळ टिकवूया असं म्हणत बॅनरबाजी केली आहे. त्यामुळे गोकुळची निवडणूक जसजशी आता जवळ येत चालले तसतशी यामध्ये अधिक रंगत वाढायला सुरुवात झाली आहे. सध्या ठराव दाखल करण्याची प्रक्रिया निबंध कार्यालयामध्ये सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news