Gokul Election 2026: गोकुळ निवडणुकीत मुश्रीफ, डोंगळे, विश्वास पाटील यांना 'जोर का झटका', तब्बल ६३९ दूध संस्था अपात्र

Gokul Election 2026
Gokul Election 2026pudhari
Published on
Updated on

Gokul Election 2026: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवरील हरकतींचा निकाल निवडणूक अधिकारी नारायण परजणे यांनी सोमवारी जाहीर केला. यामध्ये कार्यक्षेत्राबाहेरील तब्बल ६३९ दूध संस्था प्रतिनिधी अपात्र ठरविण्यात आले आहेत. तसेच संघाच्या कर्मचारी व ठेकेदारांच्या नावावरील १४८ ठराव पात्र ठरविण्यात आले आहेत.

Gokul Election 2026
Gokul Election | हरकत घेतलेल्‍या ६७७ दूध संस्‍थांचा निकाल प्रलंबित

दुग्ध विभागाने प्रसिद्ध केलेल्या ४ हजार ८९७ संस्था सभासदांच्या यादीवर ५९५ अर्जदारांनी १ हजार ७४० संस्थांवर हरकती घेतल्या होत्या. यामध्ये ६३९ संस्था अपात्र केल्याने वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांच्यासह माजी संचालकांना धक्का बसला आहे. आता ४ हजार २५८ संस्था प्रतिनिधींच्या नावाची अंतिम यादी होणार आहे.

Gokul Election 2026
Gokul Election | गोकुळच्या किकवीतील जागा खरेदीबाबत वस्तुस्थितीच्या मिरचीचा ठसका राजवर्धन निंबाळकर यांना का लागला?

दरम्यान, कार्यक्षेत्राबाहेरील अपात्र ठरविण्यात आलेल्या संस्थांना नवीन प्रतिनिधी नियुक्त करण्याची संधी देण्यात येणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गोकुळसाठी १० सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून, निवडणुकीची प्रक्रिया आता वेग घेणार आहे. दरम्यान, कार्यक्षेत्राबाहेरील ठरावधारकांना अपात्र केल्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावर जोरदार हरकत घेतली. त्यानंतर फेर पडताळणी केल्यानंतर १५० संस्था पात्र तर १७५ संस्था अपात्र ठरल्याचे निवडणूक अधिकारी नारायण परजणे यांनी जाहीर केले.

Gokul Election 2026
Satej Patil | एकहाती सत्तेसाठी पॅनेल करणार; निवडणूक बिनविरोध नाहीच : आ. सतेज पाटील

रात्री उशिरापर्यंत दुग्ध विभागात पात्र, अपात्रतेचा घोळ सुरू राहिल्याने कमालीचा तणाव निर्माण झाला होता. त्यात मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार सतेज पाटील यांचे समर्थक तिथे दाखल झाल्याने तणाव वाढत गेला होता...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news