Gokul Chairman Election : गोकुळची सत्ता महायुतीकडेच; अध्यक्ष निवडीपूर्वी हसन मुश्रीफ यांचा सतेज पाटलांवर प्रहार

Hasan Mushrif vs Satej Patil : ‘विजयाचा उन्माद केला, पण न्याय आम्हाला मिळाला’ : महायुतीचा टोला
Gokul Chairman Election
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’वर मंगळवारी (दि. १०) महायुतीचाच अध्यक्ष होईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच अध्यक्षनिवड सभेपूर्वी सकाळी महायुतीच्या नेत्यांची बैठक होईल आणि या बैठकीत अध्यक्षपदाच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहितीही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

"गोकुळच्या निवडणुकीनंतर आमदार सतेज पाटील यांनी विजयाचा उन्माद केला. मुख्यमंत्र्यांनी एकत्र चर्चा करून तोडगा काढण्याचे आवाहन केल्यानंतरही त्यांनी मोर्चा काढला; आम्हाला शिव्याशाप दिले. हे सर्व त्यांनी केले, पण न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला. सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यास न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. त्यामुळे आज गोकुळची अध्यक्षनिवड सभा सुरळीत होईल आणि या सभेत गोकुळवर महायुतीचाच अध्यक्ष बसेल," असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

Gokul Chairman Election
Gokul Chairman Election : गोकुळ अध्यक्ष निवडणुकीत शासन नियुक्त संचालकही मतदान करणार; हायकोर्टाच्या आजच्या सुनावणीत काय झाले?

समविचारी आघाडीकडून न्यायालयात शासननियुक्त संचालकांचा निर्णय विशिष्ट एका संस्थेसाठीच घेतला जात असल्याची बाजू मांडण्यात आली; पण न्यायालयाने तो मुद्दा खोडून काढला. त्यामुळे अध्यक्षपदासाठी आता २९ संचालक मतदान करतील. शासननियुक्त संचालकांचे मतदान गुप्त ठेवण्यात येईल. त्यांचे मतदान स्वतंत्र पेटीत (बॉक्‍समध्ये) ठेवले जाईल; मात्र त्यांचे मतदान मोजूनच अध्यक्षपदाचा निकाल जाहीर केला जाईल, असेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

जल्लोषासाठी कार्यकर्ते येणार

महायुतीचा अध्यक्ष होणार असल्याने कार्यकर्ते जल्लोष करण्यासाठी येतील. पण आम्ही कोणताही गोंधळ न करता संयमाने अध्यक्षनिवडीची प्रक्रिया पूर्ण करू, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Gokul Chairman Election
Gokul Politics: दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं.. विराट संघर्ष मोर्चा सुरू असतानाच GR ऑनलाईन टाकून खेळ केला?

कायदा व सुव्यवस्था पोलीस पाहतील

शासननियुक्त संचालकांबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलेल्या इशाऱ्याबाबत विचारले असता मुश्रीफ म्हणाले, "ते शासनाने नियुक्त केलेले संचालक आहेत, त्यामुळे त्यांची सुरक्षा शासन पाहील. कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासन पूर्ण खबरदारी घेईल."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.