कोल्हापूर : तमाम फुटबॉलप्रेमींना प्रतीक्षा असणारा यंदाचा (2025-26) फुटबॉल हंगाम सोमवार, दि. 1 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. प्रतिवर्षीप्रमाणे कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित केएसए शाहू छत्रपती फुटबॉल लीग फुटबॉल स्पर्धेने फुटबॉल हंगामाचा ‘किक ऑफ’ होणार आहे. पुढील सहा महिने सुरू राहणार्या हंगामासाठी छत्रपती शाहू स्टेडियम सज्ज करण्यात आले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी दुपारी 4 वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या हस्ते आणि केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या महिला अध्यक्षा सौ. मधुरिमाराजे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी डीवायएसपी प्रिया पाटील, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे, केएसएचे माणिक मंडलिक व सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
नियमावलीची सक्ती...
या वर्षीपासून कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाला ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या (एआयएफएफ) नियमावलीची सक्ती लागू करण्यात आली आहे. यानुसार खेळाडू व संघ नोंदणी प्रक्रिया सीआरएसनुसार (सेंट्रलाईज्ड रजिस्टर सिस्टीम) झाली. केएसए लीग व हंगामात होणार्या स्पर्धा या सीएमएस (कॉम्पिटिशन मॅनेजमेंट सिस्टीम) पद्धतीने होणार आहेत. यात संबंधित सर्व घटकांबद्दल त्या नोंदी एआयएफएफकडे तत्काळ होणार आहेत.
आजचे सामने
सोमवार, दि. 1 डिसेंबर : दुपारी 1.30 वाजता, संध्यामठ वि. रंकाळा तालीम. दुपारी 4 वाजता पाटाकडील तालीम अ वि. सम्राटनगर स्पोर्टस्