
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या ८१ जागांचा आज निकाल लागणार आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत जिल्ह्यातील तीन मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसचे सतेज पाटील, भाजपचे धनंजय महाडिक आणि शिवसेना शिंदे गेटाचे नेते राजेश क्षीरसागर यांनी या निवडणुकीत चांगलाच जोर लावला आहे. शहरात वट कोणाचा हे ठवरणारी ही निवडणूक असेल.
कोल्हापुरात अनेक वर्षापासून नागरी प्रश्न खूप गंभीर झाले होते. आता हक्काचे नगरसेवक मिळणार असल्याने लोकांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यंदाची निवडणूक ही थोडी वेगळी झाली होती. जरी नगरसेवक संख्या ८१ असली तरी बुहसदस्य पद्धतीमुळं एका प्रभागात ४ नगरसेवक असणार आहेत.
गेल्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती. त्यांनी मिळून महापालिकेवर आपली सत्ता प्रस्थापित केली होती. काँग्रेसचे २७ राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक मिळून ४२ अशी सदस्य संख्या झाली होती. त्यानंतर निकालानंतर शिवसेनेने बाहेरून पाठिंबा दिला होता.
काँग्रेस - २७
भाजप - ३२
राष्ट्रवादी काँग्रेस - १५
शिवसेना (एकसंध) - ४