कोल्‍हापूर : दुचाकी अपघातातील एका जखमीचा मृत्‍यू

दुचाकी अपघात
दुचाकी अपघात

कोल्‍हापूर ; (शिरोली एमआयडीसी) ; पुढारी वृत्तसेवा नागांव ता. हातकणंगले येथील राजेश मार्बलसमोर सेवा रस्‍त्‍यावर दोन मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली होती. या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले होते. त्यातील अतुल अंकुश गुडाळे याचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात आज (शनिवार) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. या अपघातात स्वप्नील उर्फ संभाजी कांबळे व अविनाश कांबळे हे जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, महामार्गाच्या सेवा मार्गावर नागाव येथील राजेश मार्बल समोर (शुक्रवारी) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला होता. अतुल गुडाळे हा मोटारसायकलवरून नागाव फाट्याच्या दिशेने निघाला होता. त्याचवेळी अविनाश कांबळे व स्वप्नील कांबळे हे दोघे मोटार सायकलवरून नागाव येथील डॉ. आंबेडकर नगर मधून शिरोली एमआयडीसीकडे निघाले होते. राजेश मार्बल येथे दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले.

अतुल गुडाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तर अविनाश व स्वप्निल हेही गंभीर जखमी झाले आहेत. तिघाही जखमींवर कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू होते. त्यापैकी अतुलचा मृत्यू झाला. या अपघातातील इतर दोघेजण गंभीर अवस्थेत असून, त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news