Bison Attack | वैरणीसाठी गेलेल्या तरुणावर गव्याचा हल्ला; युवक गंभीर जखमी

Bison Attack | पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ बोरगाव परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली.
Kolhapur news
Kolhapur news
Published on
Updated on

Bison Attack

पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ बोरगाव परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. गावातील संदीप दिनकर काटकर हा युवक वैरणीसाठी शेतात गेला असताना, उसाच्या बांधीत दबा धरून बसलेल्या गव्याने अचानक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात संदीप गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Kolhapur news
Detonator Stockpile Seizure | आळतेत डिटोनेटर स्फोटकांचा साठा जप्त

घटनेनुसार, संदीप काटकर शेतातील बांधावर उगवलेले गाजर गवत कापण्यासाठी गेला होता. परिसरात काहीच हालचाल नसल्याने तो निर्धास्तपणे काम करत असताना, उसात लपून बसलेला मोठा गवा अचानक बाहेर पडला आणि त्याच्यावर जोरदार हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की संदीप खाली कोसळला आणि त्याच्या शरीरावर गंभीर दुखापती झाल्या.

हल्ल्यात संदीपच्या उजव्या बाजूच्या पोटात गव्याचे शिंग खुपसल्याने पोट उघडल्यासारखी स्थिती झाली. शिवाय डाव्या बाजूला बरगडीजवळ खोल जखम झाली असून छातीवर मोठा मार बसल्याने बरगड्याही फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जवळपासच्या ग्रामस्थांनी धावत जाऊन त्याला मदत केली आणि तातडीने बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.

Kolhapur news
Shivaji University | प्रशासकीय मूल्यांकनात शिवाजी विद्यापीठ राज्यात तिसरे

तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला तातडीने कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात हलवले आहे. सध्या संदीपवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती नाजूक असल्याचे समजते.

दरम्यान, या भागात गेल्या काही दिवसांपासून गव्यांची हालचाल वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिकांनी वनविभागाला त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news