Seized Vehicles Auction : शिरोली पोलीस ठाण्यात ३४५ बेवारस व जप्त वाहनांचा लिलाव, मिळाली 'इतकी' सर्वोच्च बोली

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्यात गुन्ह्यातील जप्त केलेल्या आणि वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या तब्बल ३४५ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात आला.
Seized Vehicles Auction
Seized Vehicles Auction : शिरोली पोलीस ठाण्यात ३४५ बेवारस व जप्त वाहनांचा लिलाव, मिळाली 'इतकी' सर्वोच्च बोलीfile photo
Published on
Updated on

Auction of 345 Unclaimed and Seized Vehicles at Shiroli Police Station; Highest Bid Reaches ₹10.22 Lakhs

नागाव : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्यात गुन्ह्यातील जप्त केलेल्या आणि वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या तब्बल ३४५ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव सोमवारी शिरोली पोलीस ठाणे येथे पार पडला. या लिलावामध्ये शाहूपुरी (कोल्हापूर) येथील 'एस.एम.स्टील फर्म' यांनी १०,२२,०००/- (दहा लाख बावीस हजार) रुपयांची सर्वोच्च बोली लावून सर्व वाहने खरेदी केली.

Seized Vehicles Auction
Jalgaon News| जळगाव बसस्थानकावरील 'हातचलाखी' भोवली; एलसीबीची धडाकेबाज कारवाई

कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक बी. धीरजकुमार यांच्या आदेशान्वये आणि करवीर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली या लिलाव प्रक्रियेसाठी विशेष समिती गठीत करण्यात आली होती.

सोमवारी सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० या वेळेत ही लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावात भाग घेण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच धुळे जिल्ह्यातील एकूण ८२ लिलाव धारकांनी हजेरी लावली होती. लिलाव धारकांसाठी २००० रुपये नोंदणी फी ठेवण्यात आली होती.

Seized Vehicles Auction
Panhala Fake Doctor: पन्हाळ्यात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या दोघांना अटक

लिलावात ठेवण्यात आलेल्या एकूण ३४५ वाहनांमध्ये दुचाकी ३३८, चारचाकी ६, तीनचाकी १ अशा वाहनांचा समावेश होता या वाहनांच्या लिलावाच्या बोलीची सुरुवात ४,१५,०००/- रुपयांपासून करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या चुरशीच्या बोलीत एस.एम. स्टील फर्मने सर्वाधिक १० लाख २२ हजार रुपयांची बोली लावत सर्व ३४५ वाहने आपल्या नावे केली.

हा लिलाव पार पाडण्यासाठी करवीर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, मोटर परिवहन विभागाचे सुरजसिंग राजपूत, शिरोली एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अमित पांडे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण व शिरोली एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यातील पोलीस कारकून आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून लिलाव प्रक्रियेचे कामकाज पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news