Ajra Couple Death | आजऱ्यात नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये मृत्यू; गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी अंत...

Ajra Couple Death | एका नवविवाहित जोडप्याचा गॅस गिझरमधून झालेल्या वायू गळतीमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना उघडकीस आली.
Ajra Couple Death
Ajra Couple DeathOnline Pudhari
Published on
Updated on

आजरा : आंबोलीला फिरायला जाऊन आलेल्या एका नवविवाहित जोडप्याचा त्यांच्या बाथरूममधील गॅस गिझरमधून झालेल्या वायू गळतीमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना आज सकाळी आजरा शहरात उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Ajra Couple Death
Kolhapur News | 'पायपीट'ने दिली विद्यार्थ्यांच्या जिद्दीला नवी ऊर्जा: 'दै. पुढारी'चा स्तुत्य उपक्रम; गजापूर हायस्कूलमध्ये २५ विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत

सागर सुरेश करमळकर (वय ३२) आणि सुषमा सागर करमळकर (वय २६) अशी मृत पती-पत्नीची नावे असून, अवघ्या महिन्याभरापूर्वीच ते विवाहबंधनात अडकले होते. मिळालेल्या माहितीनुसार, करमळकर दाम्पत्य गेल्या रविवारी आंबोली येथे फिरायला गेले होते. आज सकाळी त्यांचे मित्र त्यांना फोन करत होते, पण त्यांनी फोन उचलला नाही.

काही वेळाने फोन बंद येऊ लागल्याने मित्रांना काळजी वाटली. त्यांनी सागर यांच्या घरी जाऊन पाहिले असता, घराचा दरवाजा आतून बंद होता. मित्रांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता, सागर आणि सुषमा हे दोघेही बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Ajra Couple Death
Karul Ghat Landslide | करूळ घाटात दरड कोसळली; सिंधुदुर्ग-कोल्हापूर वाहतूक ५ तासांपासून ठप्प

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बाथरूममधील गॅस गिझरमधून वायू गळती झाली असावी. त्यामुळे बाथरूममध्ये कार्बन मोनॉक्साईड वायू जमा झाला आणि त्यातच श्वास कोंडून या दोघांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, पुढील तपास सुरू आहे.

या घटनेने करमळकर कुटुंबीयांवर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नुकतेच नवीन आयुष्य सुरू केलेल्या या तरुण जोडप्याच्या अशा आकस्मिक मृत्यूमुळे आजरा शहरासह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news