

केशव जाधव, कोल्हापूर
बाहेर काठावर बसून समुद्राच्या लाटा न्हाहाळणे आल्हाददायक वाटते. मात्र, समुद्राच्या लाटामध्ये खेळणे, बागडणे त्याहीपेक्षा आनंददायी. वारीचेही तसेचं आहे. बाहेरून वारीचे विशाल, तरीही शिस्तबद्ध असे सुंदर दृश्य पाहताना आपल्यासुद्धा वारीमध्ये सहसभागी व्हावे, असे आतून कुठेतरी वाटून जाते आणि खरंच जेव्हा या सोहळ्यात आपण सामील होतो, तेव्हा मात्र या सोहळ्याची अशी गोडी मनामध्ये कायमची रुंजी घालून राहते. कधी एकदा आषाढ वारीचा पालखी सोहळा सुरू होतो, असे वाटत राहते.
आजपासून अगदी हजार वर्षांपेक्षा अधिक वर्षांपूर्वीपासून हा वारीचा सोहळा सुरू आहे, असे मानले जाते. मध्यतरीच्या काळात हा सोहळा खंडित होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, अणिगोसाच्या शतकात ह. भ. प. हैबत आरफळकर (हैबतबाबा) महाराज यांनी या वारी सोहळ्याचे पुनरुज्जीवन केले. एवढेच नव्हे तर वारी सोहळ्याची सुसूत्रपणे, योजनाबद्ध रचना केली. अगदी लखसाच्या थंडीत मूळचे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे हैबतबाबा खांद्यावरु शीडे संस्थानात मोठे सरदार होते. माऊलींच्या प्रेमापोटी ते वारकरी संप्रदायाकडे आकृष्ट झाले. साधारण १८३२ च्या सुमारास त्यांनी या वारी सोहळ्याला नवसंजीवनी देत सोहळ्याची पुन्हा नियोजनबद्ध सुरुवात केली. यादीला येणाऱ्या दिंड्यांची नोंदणी करून, पालखी रथाच्या पुढे आणि मागे, तसेच आरतीच्या ठिकाणी या दिंड्यांना निश्चित क्रमाने स्थान दिले.
पहाटे अगदी ब्रह्ममुहूर्तावर काकडा, हरिनाम संकीर्तन त्यानंतर पालखीचे प्रस्थान, प्रस्थानाची वारी देण्यासाठी पुढे नगारखाना, पालखीसोबत चोपदार, पट्टेदार, झेंडेपटक्या, पताका, असा सगळा प्रपंच मांडत हैबतबाबांनी अगदी कडेकोर सामाबद्ध आणि नियोजनबद्ध वारीची सुरुवात केली. त्यामुळे आजही वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही आदेशाविना स्वयप्रेरणेने स्वयस्थितित अगदी लफ्काप्रमाणे मार्ग करीत पालखी हा वारी सोहळा अखंडपणे सुरू आहे. हैबतबाबांनी घालून दिलेला शिष्टाचारप्रमाणे आजही वारी सोहळ्यामध्ये अगदी कडेकोर शिस्त पाळली जाते.
आळंदी ते पंढरपूर हे अंतर साधारण २८० किलोमीटर. हे अंतर साधारण २०-२१ दिवसांत पूर्ण करावयाचे असते. त्या हिशोबाने या मार्गावर १५ मुक्कामार्थी ठिपवणे निश्चित केलेली असते. यामध्ये साधारण आपापासून २८ किलोमीटरपर्यंतच्या अंतराचे वेगवेगळे टप्पे आहेत. सकाळी सहा-सवासाहाला पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर साधारण साडेआठ-नऊ वाजता सकाळचा पहिला विसावा येतो. या ठिकाणी वारकरी आणि मासिक मंडळी माऊलींसोबत विश्रांती घेतात आणि त्याच ठिकाणी सकाळच्या नाश्त्याचा कार्यक्रम होतो.
साधारण अर्धा-पाऊण तासाची विश्रांती घेतल्यानंतर माऊलींच्या सहसह हा पालखी सोहळा पुन्हा मार्गस्थ होतो. नंतर खाडेबारा-एकच्या दरम्यान पालखी पुढच्या विसाव्याला स्थिरवते. या ठिकाणी दुपारच्या जेवणाचा बेत होतो. सकाळपासूनूम्हातान्द्रात, पाऊस-वाऱ्यात चालत असल्याने थकलेले वारकरी दुमारे घेऊन साधारण तास - दीड तासावी विश्रांती घेत आणि पुन्हा पालखी आपल्या ठरलेल्या मुक्कामाच्या दिशेने प्रस्थान करतात. दुपारी साडेतीन-चारच्या दरम्यान आणखी एक विसावा घेतला जातो. नंतर पालखी ठरलेल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचत असते.
सोहळा जरी आनंददायी दिसत असला तरी त्याला दुसरी बाजूही असते. शारीरिक कष्टाची, कोरेऱ्या शावरने म्हटले आहे, 'प्यार का दर्द है, मीठा मीठा प्यारा प्यार' त्याप्रमाणेच वारीच्या महागात बरेच शारीरिक कष्ट आणि पीड़ा असल्या तरी अध्यात्मिक आनंद निश्चित मिळत असतो. अशा या वारीची अनुभूती आगळीवेगळी ही. एकदा तरी जरूर घ्यावी अशीच.