Aashadhi Wari 2024 : 'सिंहगड'च्या प्राध्यापकांनी बनवले पोलीस बंदोबस्तासाठी सॉफ्टवेअर

'वारी'च्या बंदोबस्ताचा रिपोर्ट एका क्लिकमध्ये मिळणार
Aashadi Wari 2024
वारीतील पोलीस बंदोबस्तासाठी प्राध्यापकांनी एक सॉफ्टवेअर बनवले आहे.Pudhari News Network

पंढरपूर: कोणताही उत्सव, यात्रा, सामाजिक, राजकीय कार्यक्रम यांचे नियोजन म्हटलं की, सर्वाधिक ताण-तणाव हा पोलीस प्रशासनावर येत असतो. पोलीस प्रशासनावरील ताणतणाव कमी व्हावा, यासाठी एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूरमध्ये काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभाग कार्यरत असलेले प्रा. सोमनाथ झांबरे यांनी सॉफ्टवेअरची निर्मिती केली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

Aashadi Wari 2024
Ashadhi Wari |वारी दृष्टीहिनांची, वाट पंढरीची : महाराष्ट्रातील पहिलीच स्वतंत्र दिव्यांगांची वारी

सध्या आषाढी वारी निमित्त पोलीस प्रशासनावर खुप मोठी जबाबदारी आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे लाखो वैष्णवांचा मेळा भरतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्रातून पोलीस बंदोबस्त मागवला जातो. गरजेनुसार ठिक-ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देण्यात येतो. यामध्ये विविध टप्प्यावर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना जबाबदारी दिली जाते. अतिशय संवेदनाशील असा हा पोलीस बंदोबस्त लावण्यासाठी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मधील कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागातील प्रा. सोमनाथ झांबरे यांनी सॉफ्टवेअर बनवले असून या सॉफ्टवेअर द्वारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या बंदोबस्ताचे ठिकाणची माहिती, आपल्या पॉईंटचे, प्रभारी, सहप्रभारी, आपल्यासोबत असणारी टीम, हजेरी रेकॉर्ड, ड्युटी शिफ्ट अशी सर्व प्रकारची माहिती मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.

Aashadi Wari 2024
पंढरीची वारी आज लोणंदनगरीत!

तसेच त्यांच्या मोबाइलमध्येच डिजिटल स्वरूपात ड्युटी पास देखील उपलब्ध होणार आहे. याशिवाय वरिष्ठ पोलीस अधिकारी वेळोवेळी संपूर्ण बंदोबस्ताच्या ठिकाणी असणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महत्वाच्या सूचना पाठवू शकणार आहेत. बंदोबस्त कंट्रोल विभाग संपूर्ण बंदोबस्त स्कीम, दैनंदिन गैरहजेरी अहवाल, कसुरी अहवाल, ड्युटी चार्ट असे अनेक रिपोर्ट एका क्लिक मध्ये या सॉफ्टवेअरमधून मिळवू शकणार आहेत.

Aashadi Wari 2024
वारकऱ्यांसाठी खुशखबर|आषाढी वारी करणाऱ्या दिंड्यांना मिळणार 68 लाख रुपये

वरिष्ठ अधिकारी संपूर्ण बंदोबस्त चेक करून बंदोबस्तावरील सर्व अधिकारी, अंमलदार यांच्या हजेरीच्या नोंदी घेऊ शकणार आहेत. याशिवाय अशा अनेक सुविधा या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पोलीस प्रशासनास मिळणार आहेत.हे सॉफ्टवेअर पोलीस प्रशासनासठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असे या सॉफ्टवेअर माहिती घेतल्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलीसचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news