कोल्हापूर : कत्तलखान्यात वासरे, रेडके घेऊन जाणारा मिनी ट्रक पकडला

कोल्हापूर : कत्तलखान्यात वासरे, रेडके घेऊन जाणारा मिनी ट्रक पकडला
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा येथे कर्नाटकात कत्तलखान्यात जनावरे घेऊन जाणारा मिनी ट्रक प्राणी मित्रांनी पोलिसांच्या मदतीने पकडून 37 वासरे, रेडके व मिनी ट्रक असा सुमारे 5 लाख 18 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. रेडके, वासरे ही जनावरे गोशाळेत पाठवण्यात आली.

सोमवारी पेठवडगाव येथील आठवडा बाजारातून गोवंश जातीची वासरे व रेडके कत्तल करण्याच्या उद्देशाने कर्नाटक-संकेश्वरच्या दिशेने मिनी ट्रक (एमएच 09 जीजे 1671) या मालवाहतूक गाडीमधून घेऊन जात असताना काही प्राणी मित्रांना शिये फाटा येथे गाडीचा पाठलाग करून नागाव फाटा गाडी अडवली. चालकाकडे चौकशी केली असता स्वप्नील मधुकर सूर्यवंशी यांची जनावरे असल्याचे सांगून ती संकेश्वर येथे असलेल्या कत्तलखान्यात सोडण्यासाठी घेऊन जात होते. यामध्ये सात हजार किमतीची गोवंश जातीची गायीची वासरे चौदा व म्हशीची रेडके 23 व गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली. यावेळी प्राणी मित्र वैभव जाधव, आशिष बारिक तसेच शिरोली  शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अर्जुन चौगुले, सुजित करके, नितीन दळवी, प्रशांत पाटील निलेश लंबे, विनोद यादव आदींचे सहकार्य लाभले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news