मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने व विश्वनाथराव पाटील कला क्रीडा सांस्कृतिक व्यायाम मंडळ प्रणित लाल आखाडा मुरगूड यांच्या वतीने माजी नगराध्यक्ष, बिद्रीचे ज्येष्ठ संचालक प्रवीणसिंह पाटील यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त दिनांक ३ ते ५ फेब्रुवारी अखेर मॅटवरील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा विविध १६ वजनी गटात आयोजित करण्यात आली आहे. ही माहिती विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेचे उपाध्यक्ष वसंतराव शिंदे, अॅड. सुधीर सावर्डेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खुल्या गटातील प्रथम क्रमांकासाठी १ लाख २५ हजार ६२५ व लाल आखाडा संकुल चषक, चांदीची गदा, द्वितीय क्रमांकासाठी ७५ हजार ६१६ रुपये रोख व चषक तृतीय क्रमांकासाठी ५० हजार ६१६ रुपये रोख व चषक तर चतुर्थ क्रमांकासाठी २१ हजार ६१६ व चषक असे बक्षीस देण्यात येणार आहे. ५७ किलो वजनी गटासाठी उपमहाराष्ट्र केसरी कै. प्रकाश चौगले चषक तर ४६ किलो गटासाठी कै. अर्जुन मसवेकर चषक कुमार केसरी गदा पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे.
८४ किलो गट प्रथम २५ हजार, द्वितीय १६ हजार, तृतीय १० हजार, चतुर्थ ५ हजार व चषक, ७४ किलो गट प्रथम २१ हजार, द्वितीय १५ हजार, तृतीय ११ हजार, चतुर्थ ४ हजार व चषक, ६५ किलो गट प्रथम ११ हजार, द्वितीय ८ हजार, तृतीय ६ हजार, चतुर्थ ३ हजार व चषक, ६१ किलो गट प्रथम १० हजार, द्वितीय ७ हजार, तृतीय ५ हजार, चतुर्थ ३ हजार व चषक, ६० किलो गट प्रथम १० हजार, द्वितीय ७ हजार, तृतीय ५ हजार, चतुर्थ ३ हजार व चषक, ५७ किलो गट प्रथम ६ हजार, द्वितीय ४ हजार, तृतीय ३ हजार, चतुर्थ १५०० व चषक, ५२ किलो गट प्रथम ६ हजार, द्वितीय ४ हजार, तृतीय ३ हजार, चतुर्थ १५०० व चषक, ४६ किलो गट प्रथम ५ हजार, द्वितीय ३ हजार, तृतीय २ हजार, चतुर्थ १००० व चषक, ४० किलो गट प्रथम ५ हजार, द्वितीय ३ हजार, तृतीय २ हजार चतुर्थ १ हजार व चषक, ३५ किलो गट प्रथम ४ हजार, द्वितीय ३ हजार, तृतीय २ हजार, चतुर्थ १ हजार व चषक, ३२ किलो गट प्रथम ३ हजार, द्वितीय २ हजार, तृतीय १ हजार, चतुर्थ ७०० व चषक, ३० किलो गट प्रथम ३ हजार, द्वितीय २ हजार, तृतीय १ हजार, चतुर्थ ७०० व चषक, २८ किलो प्रथम ३ हजार, द्वितीय २ हजार, तृतीय १ हजार, चतुर्थ ७०० व चषक, २५ किलो प्रथम ३ हजार, द्वितीय २ हजार, तृतीय १ हजार, चतुर्थ ७०० व चषक, २० किलो प्रथम १ हजार, द्वितीय ७००, तृतीय ५००, चतुर्थ २०० व चषक देण्यात येणार आहे.
यावेळी स्वागत राहुल वंडकर यांनी केले प्रसंगी वसंतराव शिंदे, सुधीर सावर्डेकर, संजय मोरबाळे, नामदेव भांदीगरे, जगन्नाथ पुजारी, सम्राट मसवेकर, राजु आमते, अमर देवळे, राजु चव्हाण, गुरुदेव सुर्यवंशी, राहुल वंडकर, अनिल शिंदे, राजू सोरप उपस्थित होते. आभार नामदेव भांदीगरे यांनी मानले.
मुरगूडमध्ये ३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेप्रमाणे गॅलरी व क्रीडांगण तयार करण्यात येणार असून नियमावली त्याप्रमाणेच आहे. महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत उतरलेले पैलवान या कुस्ती स्पर्धेसाठी येणार आहेत. ही स्पर्धा फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून अन्य राज्यातून पैलवान उतरणार असल्यामुळे एक आकर्षण बनले आहे. यापूर्वी मुरगूडमध्ये कधीही खुला गटातील स्पर्धा झाल्या नाहीत. खुल्या गटातील स्पर्धा या वजनी गटात आयोजित केल्या होत्या. मात्र, यावेळी कुस्ती स्पर्धा खुल्या ठेवल्याने प्रेक्षकांना आनंद होणार आहे.
हेही वाचा :