कोल्हापूर : अंबाबाई, जोतिबा मंदिर भाविक दर्शन संख्या कमी केली, तासी १ हजार ऐवजी ४०० भाविकांना प्रवेश | पुढारी

कोल्हापूर : अंबाबाई, जोतिबा मंदिर भाविक दर्शन संख्या कमी केली, तासी १ हजार ऐवजी ४०० भाविकांना प्रवेश

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने नवीन निर्बंध लागू केले आहेत. या अंतर्गत धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पन्नास पेक्षा अधिक लोक एकावेळी एकत्र येऊ नयेत. याची खबरदारी म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती तर्फे भाविकांची दर्शन संख्या कमी करण्यात आली आहे. यानुसार तासी १ हजार ऐवजी ४०० भाविकांना ई-दर्शन पास द्वारे सोडण्यात येणार आहे. (अंबाबाई मंदिर)

सोमवार दिनांक १० जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती चे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. (अंबाबाई मंदिर)

Back to top button