शिरोळ : छत्रपती शिवरायांच्या पुतळा विटंबनप्रकरणी निषेध रॅली; शिवभक्त एकवटले | पुढारी

शिरोळ : छत्रपती शिवरायांच्या पुतळा विटंबनप्रकरणी निषेध रॅली; शिवभक्त एकवटले

शिरोळ, पुढारी वृत्तसेवा

बंगरूळूतील सदाशिवनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याप्रकरणी शिरोळमधील शिवभक्त संतप्त झाले. या घटनेच्या निषेर्धात आज रात्री आठ वाजता येथील शिवभक्तांनी रॅली काढून छत्रपती शिवरायांच्या जयघोष करत, विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. या मागणीचे निवेदन शिरोळ पोलीस ठाण्यात देण्यात आले.

शिवप्रतिष्ठानचे रावसाहेब देसाई यांच्या नेतृत्वाखाली निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शिवप्रतिष्ठान, शिवसेना, सर्व तरुण मंडळे, वेगवेगळ्या संघटनांतर्फे छत्रपती संभाजी महाराज चौकात, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध करून छत्रपतींच्या नावाचा जयघोष करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे अराध्य दैवत असून, त्यांना मानाचा मुजरा केला जातो. त्यांच्या पुतळ्याची विटंबना ही निंदनीय घटना आहे. विटंबना प्रकरणी कर्नाटक शासनाने कठोर पावले उचलावीत व समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी देसाई यांनी केली.

निषेध सभा झाल्यावर सर्वांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर पोलीस ठाण्यात जावून याबाबतचे निवेदन दिले. यावेळी प्रवीण चुडमुंगे, शिवतेज चूडमुंगे, बाळ बाबर, शिवाजी माने, विकी सकपाळ, विजय चव्हाण, स्वप्निल ढेरे, विजय केंपवाडे, संकेत माने, मयूर जाधव, सागर काळे,अभिजीत फडतारे, दीपक माने, सतीश चव्हाण, गुरुदत्त देसाई, विनायक पाटील, श्रेयस माने, नितीन कोळी यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button