पुढारी ऑनलाईन डेस्क : बकरी ईदच्या निमित्ताने शेअर बाजार सोमवार (दि. १६ जून) व्यवहारासाठी बंद राहणार आहे. शनिवार आणि रविवार सुट्टीबरोबरच सोमवारी असणार्या बकरी ईदनिमित्त असणार्या सुट्टीमुळे सलग तिसर्या दिवशी शेअर बाजार बंद राहणार आहे.
राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) च्या अधिकृत वेबसाइटनुसार मंगळवारी (दि. १७ जून) व्यापार पुन्हा सुरू होणार आहे. दरम्यान मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (MCX) ने शेअर केलेल्या माहितीनुसार, बकरी ईदमुळे सोमवारी पहिल्या सत्रासाठी ट्रेडिंग बंद राहणार आहे. एमसीएक्सचे दुसरे सत्र सायंकाळी ५ वाजता सुरू होईल.
गेल्या आठवड्यात, निफ्टी-५० निर्देशांक आणि बीएसई सेन्सेक्समध्ये प्रत्येकी ०.५ टक्क्यांची किरकोळ वाढ दिसून आली, बाजाराच्या अपेक्षा अधिक तेजीत असल्याने नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला. जागतिक बाजारातील स्थिरतेचे सकारात्मक परिणाम शुक्रवारी ( १४ जून) देशांतर्गत शेअर बाजारावर होताना दिसत आहेत. आठवड्याच्या अखेरच्या दिवशीही शेअर बाजारात तेजीचे वारे कायम राहिले. आज मिडकॅप निर्देशांक विक्रमी उच्चांक गाठला. निफ्टी पहिल्यांदा 23,490 च्या पातळीवर गेला. नवीन विक्रमी उच्चांक करत बाजार उच्च पातळीवर बंद झाले. निफ्टीने 23,490 चा नवा विक्रम केला. निफ्टी 66 अंकांनी वाढून 23,465 वर बंद झाला. सेन्सेक्स 181 अंकांनी वाढून 76,992 वर st निफ्टी बँकही 155 अंकांनी वाढून 50,002 वर बंद झाला. दुसरीकडे, रुपया 1 पैशांनी कमजोर हाेत 83.56/$ वर बंद झाला आहे.मिड-कॅप निर्देशांकाने सुमारे 3.6 टक्क्यांच्या वाढीसह आणि लार्ज-कॅप समभागांच्या कामगिरीला मागे टाकत स्मॉल-कॅप निर्देशांक 5 टक्क्यांनी वाढला.