कोल्हापूर: टोप कासारवाडी येथे अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू

रणजीत पाटील
रणजीत पाटील

कासारवाडी : पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील टोप-कासारवाडी रस्त्याला डॉन बिअर शॉपीजवळ मोटरसायकल व टेम्पो यांच्या झालेल्या अपघातात मनपाडळे येथील रणजीत अशोकराव पाटील (वय २८) या तरुणाचा मृत्यू झाला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रणजीत पाटील हे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास टोपवरून कासारवाडीमार्गे आपल्या मोटरसायकलवरून मनपाडळेकडे येत होते. यावेळी टोप कासारवाडीमध्ये डॅान बिअर शॉपीजवळ त्यांच्या दुचाकीची छोटा टेम्पोला जोराची धडक बसली. यात रणजीत पाटील उडून रस्त्यावर पडले. यात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news