कोल्हापूर: राशिवडेतील शेतकऱ्यांच्या मुलांची इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड | पुढारी

कोल्हापूर: राशिवडेतील शेतकऱ्यांच्या मुलांची इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड

राशिवडे: पुढारी वृत्तसेवा : राशिवडे (ता. राधानगरी) येथील श्री नागेश्वर हायस्कूलची विद्यार्थीनी सीमा काशिनाथ जोंग व विश्वजित सुनिले बिरंजे या दोन विद्यार्थ्यांची इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली. उतुंगतेज फौंडेशनच्या उतुंगतेज बालवैज्ञानिक  स्पर्धेतून या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी राज्यातून ३ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. जोंग ही मेंढपाळाची तर बिरंजे हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा आहे. पोरीनं पांग फेडला म्हणत काशिनाथ जोंगने आनंद व्यक्त केला आहे.

बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेतून निवड

  • राज्यभरातून एकूण २३०० विद्यार्थ्यांनी २८ परीक्षा केंद्रावर परीक्षा
  • गुणवत्ता यादीनुसार ३०० विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड
  • ५ वी ते ७ वी या गटातून १५० तर ८ वी १० वी गटातून १५० विद्यार्थी होते.
  • ऑनलाईन मुलाखतीतून ६५ विद्यार्थ्यांची निवड

उत्तुंगतेज फाउंडेशन द्वारा घेण्यात आलेल्या उत्तुंगतेज बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण २३०० विद्यार्थ्यांनी २८ परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली होती. गुणवत्ता यादीनुसार ३०० विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली होती. यात ५ वी ते ७ वी या गटातून १५० तर ८ वी १० वी गटातून १५० विद्यार्थी होते.

ऑनलाईन पद्धतीने मुलाखतीतून ६५ विद्यार्थ्यांची इस्रो, आयआयटी, सायन्स सिटी येथे विज्ञान अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. यामध्ये श्री नागेश्वर हायस्कूल, राशिवडेचे दोन विद्यार्थी पात्र ठरले. या दोघांना इस्त्रो भेटीची संधी मिळणार आहे.

या विद्यार्थ्यांना शाळेतील उपक्रमशील विज्ञान शिक्षक एम. एस. सुतार  यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिव, सर्व संचालक, शाळेचे मुख्याध्यापक एस. एल. चौगले, पर्यवेक्षक डी. बी. टिपुगडे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा 

Back to top button