कोल्हापूर : अवैद्य गौण खनिज कारवाईत सातत्याची गरज; एकाच पासवर दिवसभर वाहतूक

गौणखनिज www.pudhari.news
गौणखनिज www.pudhari.news
Published on
Updated on

कासारवाडी; पुढारी वृत्तसेवा : येथील परिसरात अवैद्य गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते. याबाबत नुकतीच खनिकर्म अधिकाऱ्यांनी कारवाई केली असली तरी या भागात अशा कारवायांची सातत्याची गरज आहे.

हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी, मनपाडळे करवीर तालुक्यातील सादळे मादळे डोंगर परिसरातून मुरूम दगड काढून त्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. या व्यवसायात शासकीय परवाने अतिशय महत्त्वाचे असतात. ग्रामपंचायतीच्या नाहरकत दाखल्यापासून पासून पर्यावरणाच्या दाखल्यापर्यंत विविध परवाने आवश्यक असतात. तसेच मुरूम किंवा दगड काढताना महसूल विभागाला रॉयल्टी भरून परवाना घेऊन त्याचे उत्खनन व वाहतूक करायची असते.

हा परिसर डोंगर विभाग आणि वन विभागाच्या परिसरात असल्याने निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. पण, शेतजमीन सपाटीकरण, खाणपट्टा याद्वारे या भागाचे सौंदर्य नष्ट होत आहे. यासोबतच परिसरातील पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. याबाबत शासकीय अधिकाऱ्यांनी हाताशी धरून कमी डंपरची रॉयल्टी भरून अनेक ब्रास उत्खनन व वाहतूक केली जाते. चार दिवसापूर्वीच स्वतः खाणीकर्म अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरत या कारवाई केली पण या कारवाईत सातत्य किती राहणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

४० ब्रास रॉयल्टी भरून ४०० ब्रास उत्खनन

शेतजमीन सपाटीकरण तसेच दगड उत्खननात एका गट नंबर मधून दुसऱ्या गट नंबर मध्ये वाहतूक करायचे असल्यास शासनाला रॉयल्टी (स्वामीत्वधन) शासनाला भरावे लागते. यामध्ये ४० ब्रास भरून ४०० ब्रास उत्खनन केले जाते.

एकाच पासवर दिवसभर वाहतूक

मुरूम दगड वाहतूक करण्यासाठी महसूल विभागाचा पास काढणे आवश्यक आहे. परंतु, शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून एकाच पास वर दिवसभर वाहतूक सुरू आहे.

या परिसरावरातील अवैद्य व्यवसायावर आमचे लक्ष आहे. याबाबत आम्ही स्थानिक यंत्रणेला सुचेना दिल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार वेळोवेळी अवध्य व्यवसायावर कारवाया केल्या जातील.
– आनंद पाटील, जिल्हा खाणीकर्म अधिकारी, कोल्हापूर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news