राष्ट्रीय स्पर्धेत नेमबाज अनुष्का पाटील हिची सुवर्णपदकावर माेहर | पुढारी

राष्ट्रीय स्पर्धेत नेमबाज अनुष्का पाटील हिची सुवर्णपदकावर माेहर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा: दिल्ली येथे सुरू असलेल्या ६४ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का रवींद्र पाटील हिला १० मीटर एयर पिस्टल प्रकारात युथ गटात सांघिक सुवर्णपदक मिळाले.

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारतातील १६ राज्यातून ४९९ मुलींनी भाग घेतला होता. नेमबाज अनुष्का रवींद्र पाटील हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत शर्वरी भोईर व जानवी देशमुख यांच्या मदतीने १६८३ गुणांची कमाई करत दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. या स्पर्धेत तुल्यबळ मांडल्या जाणाऱ्या दिल्लीला १६७९ गुणांसह रौप्य व उत्तर उत्तरप्रदेशला १६७५ गुणांसह कास्य पदकावर समाधान मानावे लागले.

यापूर्वी तिने जर्मनी येथील जागतिक ज्युनियर नेमबाजी स्पर्धेत व इराण येथील आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताला सांघिक सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

अनुष्का पाटील गोखले कॉलेजची विध्यार्थीनी आणि कोल्हापूर क्रीडा प्रबोधिनीची अनिवासी खेळाडू आहे. तिला प्रबोधिनीचे प्राचार्य चंद्रशेखर साखरे, युवराज साळुंखे, विनय पाटील, युवराज चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button