आंतरराष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धा : कोल्हापूरच्या रमा पोतनीस यांची पंच म्हणून निवड | पुढारी

आंतरराष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धा : कोल्हापूरच्या रमा पोतनीस यांची पंच म्हणून निवड

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : साऊथ कोरिया येथे दिनांक ६ ते १२ डिसेंबर २०२१ रोजी सहा देशांतर्गत ‘एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी’ स्पर्धा सुरू आहेत. यातील आंतरराष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेसाठी (आंतरराष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धा) कोल्हापूरच्या कु. रमा प्रमोद पोतनीस यांची संपूर्ण भारतातून एकमेव पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.  या स्पर्धेत भारत, जपान कोरिया ,मलेशिया ,थायलंड व चीन या देशांचा समावेश आहे.

यापूर्वी कु. रमा प्रमोद पोतनीस यांनी सुरुवातीस मलेशिया येथे ॲडव्हान्स अंपायर कोर्स केला आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय साउथ एशियन गेम्स (गुवाहाटी), पाच राष्ट्रांच्या हॉकी स्पर्धा (स्पेन), भारत विरुद्ध बेलारुस कसोटी सामना (भोपाळ ), एशियन जूनियर वूमन्स कप (सिंगापूर) अशा विविध ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्ये उत्तमरित्या काम केले आहे.

तसेच देशांतर्गत हॉकी इंडियामार्फत राष्ट्रीय ज्यूनियर, सीनियर व अखिल भारतीय पातळीवरील दिल्ली, छत्तीसगड, केरळ, हरियाणा, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, झारखंड व पुणे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे. (आंतरराष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धा )

रमा पोतनीस यांना हॉकी महाराष्ट्राचे सेक्रेटरी मनोज भोरे, हॉकी कोल्हापूरच्या अध्यक्षा सौ. सुरेखा पाटील, उपाध्यक्ष विनोद नाईकवाडी , सेक्रेटरी मोहन भांडवले, ट्रेझरर- सागर जाधव व इतर सर्व पदाधिकारी व सदस्यांचे प्रोत्साहन लाभले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button