कोल्हापूर: नृसिंहवाडी येथे भाविकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना

नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरासमोरील कृष्णा नदीच्या पात्रात भाविकांच्या संरक्षणासाठी दत्त देवस्थान कमिटीच्य़ा पुढाकाराने विविध उपयोजना राबवण्यात आल्या आहेत.
नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरासमोरील कृष्णा नदीच्या पात्रात भाविकांच्या संरक्षणासाठी दत्त देवस्थान कमिटीच्य़ा पुढाकाराने विविध उपयोजना राबवण्यात आल्या आहेत.

नृसिंहवाडी, पुढारी वृत्तसेवा : दत्त दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने श्री नृसिंहवाडी देवस्थान कमिटी मार्फत, मंदिराजवळ असणाऱ्या कृष्णा नदीत कोणताही अपघात होवू नये यासाठी, दत्त मंदिरासमोर रबरी इंनर तसेच लाईफ जॅकेट आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. सध्या उन्हाळी सुट्टी असल्याने दत्त मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

नवीन पोहायला शिकलेले, पोहायला न येणारे, भाविक पाण्याचा अंदाज न आल्याने नदीत बुडून मृत्यूमुखी पडतात. प्रतिवर्षी अशा घटना घडत असतात. या अनुषंगाने दत्त देवस्थानामार्फत यात्रेकरूंच्या नदीकाठावरील सुरक्षेसाठी गस्त घालण्यासाठी सुरक्षा रक्षकांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी (दि.27) छत्रपती संभाजीनगर मधील युवक तेजस कुलकर्णी हा पोहायला न येत असल्यामुळे तसेच नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू पावल्याची घटना घडली होती. या धरतीवर देवस्थान कमिटीमार्फत विविध उपाय योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

याचबरोबर नदीघाट आणि मंदिर परिसरात नदीच्या खोल पाण्याबाबत भाविकांसाठी सूचनाफलक लावले आहेत. यासाठी अध्यक्ष वैभव पुजारी, सचिव संजय, श्रीपाद पुजारी यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच याबाबत ध्वनिक्षेपकावरून वारंवार सूचनाही दिल्या जात आहेत. यामुळे यात्रेकरूंनी काळजी घेऊन या सूचनांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news