कोल्हापूर: अंबप येथे कुऱ्हाडीचे घाव घालून तरुणाचा निर्घृण खून | पुढारी

कोल्हापूर: अंबप येथे कुऱ्हाडीचे घाव घालून तरुणाचा निर्घृण खून

किणी, पुढारी वृत्तसेवा: पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून कुऱ्हाडीचे घाव घालून तरुणाचा निर्घृण खून केला. ही घटना आज (दि.२०) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अंबप येथे घडली. आमिर करीम मुल्ला (वय ३२ रा. अंबप ता. हातकणंगले) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयित खंडू वाघमोडे याला वडगाव पोलिसांनी दोन तासांतच ताब्यात घेतले आहे. Kolhapur News

हेही वाचा 

Back to top button