कोल्हापूर : सरवडे येथील १० वर्षाच्या मुलाचा कालव्यात बुडून मृत्यू  | पुढारी

कोल्हापूर : सरवडे येथील १० वर्षाच्या मुलाचा कालव्यात बुडून मृत्यू 

 सरवडे; पुढारी वृत्तसेवा : येथील १० वर्षाच्या मुलाचा आज (दि.१९) नाधवडे (ता. भुदरगड) येथील कालव्यात बुडून मृत्यू झाला. श्रीराज पाटील (वय १० ) असे या मुलाचे नाव आहे. या घटनेची नोंद भुदरगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी, राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील कुमार विद्या मंदिर शाळेत तिसरीत शिकणारा श्रीराज हा चैत्र यात्रेनिमित्त नाधवडे येथे मामाच्या गावी चार दिवसापूर्वी आला होता.  लहान मावस भाऊ व शेजारच्या लहान मुलांसोबत कालव्याच्या पाण्यात आंघोळीला गेला होता. त्याने कालव्यात उडी मारली तो वरती आलाच नाही. मुलानी शोधाशोध केली असता तो उशिरा सापडला. त्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला .या घटनेची नोंद भुदरगड पोलीस ठाण्यात झाली आहे .ग्रामीण रुग्णालय गारगोटी येथे शवविच्छेदन करण्यात आले.

सरवडे येथे तिसरीच्या वर्गात शिकणारा श्रीराज हा अतिशय हुशार विद्यार्थी होता.  नुकत्याच झालेल्या तिसरीच्या विविध खाजगी परीक्षेत त्याने धवल हे संपादन केले होते. त्याचे गावांमध्ये डिजिटल बोर्ड ही लावण्यात आले होते. अशा हुशार एकुलता एका मुलाच्या निधनाने आईने  एकच हंबरडा फोडला. त्याच्या आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.

हेही वाचा :

Back to top button