मोदींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या शिलेदारांना निवडून द्या : मुख्यमंत्री | पुढारी

मोदींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या शिलेदारांना निवडून द्या : मुख्यमंत्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज आज (दि.१५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत भरण्यात आले. “मोदींचे हात बळकट करण्यासाठी संजय मंडलिक आणि धैर्यशील माने या महायुतीच्या शिलेदारांना विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.

अर्ज भरण्यासाठी महायुतीच्या सर्व पक्षांचे आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार आणि प्रमुख नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “५०- ६० वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही, ते १० वर्षात पंतप्रधान मोदींनी केलं आहे. या देशात कोणी उपाशी राहू नये यासाठी निर्णय घेणाऱ्या पंतप्रधानांच्या पाठीशी आपण उभे राहायचा आहे. काँग्रेसने जाहीरनामा नाही तर माफीनामा जाहीर केला पाहीजे. त्यांनी देशाला खड्ड्यात घातलं, देशाला अधोगतीकडे नेलं. काँग्रेसला धडा शिकवा. पंतप्रधान मोदींमुळे देशाच्या अर्धव्यवस्थेला चालना मिळाली. हे सरकार विकासाला महत्व देणार आहे. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना मतं म्हणजे देशाच्या विकासाला मतं आहे. आपलं मत मोदींना जाणार आहे. मोदींचे हात बळकट करायचे आहेत. ही रयतेची निवणूक आहे, जनता महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : 

Back to top button