आ. प्रकाश आबिटकर यांच्या मतदारसंघात 331 कोटी रूपयांची विकासकामे | पुढारी

आ. प्रकाश आबिटकर यांच्या मतदारसंघात 331 कोटी रूपयांची विकासकामे

गारगोटी : रविराज वि. पाटील

विस्ताराने मोठ्या असलेल्या राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघात रस्ते, पाणी, वीज, मूलभूत सोयींबरोबरच, जलसंधारण, लघू प्रकल्प, पर्यटनस्थळांच्या विकास विधीसह 331 कोटी रुपयांची विकासकामे शिवसेनेचे आ. प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून प्रगतिपथावर आहेत. पुढील तीन वर्षांत रोजगार निर्मिती प्रकल्प, पर्यटन विकास व हरितक्रांती घडविण्यासाठी त्यांचे अथक प्रयत्न सुरू आहेत.

कोरोना महामारीमध्ये दोन वर्षांचा कालावधी गेला. त्यामुळे मतदारसंघातील विकासकामांना मोठा ब्रेक लागला. तरीदेखील त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण कामे मार्गस्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकर्‍यांचे जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी राधानगरी तालुक्यातील धामणवाडी प्रकल्पासाठी 325 कोटी रुपयांची तत्त्वत: मान्यता मिळवली असून 100 कोटी रुपयांची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

आप्पाचीवाडी प्रकल्पासाठी 20 कोटी 63 लाख, पडखंबे लघू प्रकल्पासाठी 14 कोटी, फये प्रकल्पाची गळती काढण्यासाठी 1 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याच बरोबर बारवे-नागणवाडी, पडखंबे, निष्णप, सर्फनाला प्रकल्पाची कामे प्रगतिपथावर असून तीन तालुक्यांत 25 कोटी रुपयांच्या नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित होणार आहेत.

बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी पर्यटन वाढणे ही काळाची गरज ओळखून राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य पर्यटनस्थळ विकासासाठी प्रयत्न सुरू असून दोनवडे धबधबे, गारगोटी नदीघाट परिसर सुशोभिकरण काम पूर्ण केले आहे.

याचबरोबर छोट्या-मोठ्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मूलभूत सुविधा पुरवून पर्यटन वाढीसाठी विशेष लक्ष दिले आहे. 9 तलाठी कार्यालयांसाठी 2 कोटी 47 लाख, तर आजरा उपजिल्हा रुग्णालयासाठी 27 कोटी 56 लाख, सोळांकूर ग्रामीण रुग्णालयासाठी 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आजरा शहरातील कामे 10 कोटी, पाणीपुरवठा योजनेसाठी 14 कोटी रुपयांचा निधी नगरपंचायतीला मंजूर केला आहे.

चीन च्या ताब्यात युगांडाचे एंटेब्बे आंतरराष्ट्रीय विमानतळ

पर्यटन विकासाबरोबरच रोजगार निर्मितीसाठी औद्योगिक प्रकल्प उभा करण्याचा आ. आबिटकरांचा मानस असून त्या द़ृष्टीनेही त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

आ. प्रकाश आबिटकर यांचा विकासकामांचा धडाका सुरू असून राधानगरी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button